बिहारमध्ये महाआघाडीत राजदचाच वरचष्मा? काँग्रेसला मिळणार फक्त इतक्या जागा, कसा आहे जागावाटपाचा फॉर्म्यूला?
बिहारमध्ये वर्षअखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनी वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान निवडणुकांआधी राजद, काँग्रेस, डावे पक्ष आणि इतर मित्रपक्षांच्या महाआघाडीत जागावाटपावरून गोंधळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.राष्ट्रीय जनता दल (राजद) २०२० प्रमाणे सुमारे १४० जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. कॉंग्रेसने गेल्यावेळी ७० जागा लढवल्या होत्या. मात्र आता फक्त ५०-५५ जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे.
Tej Pratap Yadav: मोठी बातमी! राष्ट्रीय जनता दलात मोठा भूकंप; कुटुंबात मोठी फूट पडणार
राजद पुन्हा सर्वात मोठा पक्ष बनण्याची रणनीतीवर आखत आहे, तर काँग्रेसला मागील पराभवाची किंमत मोजावी लागणार आहे. कॉंग्रेसला कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. स्ट्राइक रेटच्या आधारे राजद काँग्रेसच्या जागा कमी करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याची माहिती आहे.
राजद : १४४ जागांवर निवडणूक लढवली, ७५ जागांवर विजय
काँग्रेस: ७० जागांवर निवडणूक लढवली,, फक्त १९ जागा जिंकता आल्या
माकप (एमएल): १९ पैकी १२ जागा जिंकल्या
माकप आणि माकप (एम): अनुक्रमे ६ आणि ४ जागा लढल्या
राजदच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मते, आता विकासशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) आणि पासवान गटाचा राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी (आरएलजेपी) सारखे नवीन पक्षही महागठबंधनात सामील झाले आहेत, त्यांनाही जागा द्याव्या लागतील. त्यामुळे काँग्रेसला समाधान इतक्याच जागांवर समाधान मानावं लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
राजदच्या सूत्रांनुसार, काँग्रेस ७० जागांच्या मागणीवर ठाम असली तरी ५५-६० च्या आसपास जागांवर सहमती दर्शवेल. पहिल्या रिपोर्टमध्ये कॉंग्रेसला ४० जागा मिळतील असं वृत्त होतं. तरीही इतक्याच जागा मिळतील.२०२० मध्ये सर्वात मोठा पक्ष बनल्यानंतर आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढल्यानंतर, राजदचा आत्मविश्वास वाढला आहे. यावेळी १३५-१४० जागांवर निवडणूक लढवून बहुमताच्या जवळ पोहोचू शकतो असे पक्षाचे म्हणणे आहे.
व्हीआयपी (मुकेश साहनी): ६० जागांची मागणी, पण फक्त १२ जागा मिळण्याची शक्यता.
आरएलजेपी (पशुपती पारस): २-३ जागा मिळण्याची शक्यता
सीमांचल प्रदेशात मर्यादित फायदा असूनही, एआयएमआयएमला युतीत समाविष्ट केल्याने बिहारच्या उर्वरित भागात आरजेडीला नुकसान होण्याची भीती आहे. २०२० मध्ये एआयएमआयएमने ५ जागा जिंकल्या होत्या, परंतु नंतर त्यांचे ४ आमदार आरजेडीमध्ये सामील झाले होते. दरम्यान आतापासूनच जागावाटपाचाही मुद्दा तापू लागला असून कोणाला किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.