Photo Credit :Team navrashtra
नवी दिल्ली: जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून लोकसभेत मंगळवारी (30 जुलै) भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. जातीय जनगणेच्या मुद्द्यावरून बोलत असताना, भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधीं यांच्यावर निशाणा साधला. ज्यांच्या जातीचा पत्तामंगळवारी लोकसभेत भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात जोरदार वादावादी झाली. चक्रव्यूहबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यावर अनुराग ठाकूर यांनी जातीचा उल्लेख केला. जातीचा उल्लेख होताच लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. राहुल गांधी म्हणाले की, जातीची जनगणना नक्कीच केली जाईल. नाही तेच जातीय जनगणेनेवर बोलत आहेत, अशी टीकाही केली. राहुल गांधींवरील या टीकेनंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली होती.
अनुराग ठाकूर यांच्या या टीकेला काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीदेखील सडेतोड उत्तर दिले आहे. “अनुराग ठाकूर यांना राहुल गांधींची जात जाणून घ्यायची असेल तर ते स्वतः जाऊन जनतेला विचारू शकतात. मला तुमची जात जाणून घेण्यात अजिबात रस नाही, पण तुम्ही, प्रक्षोभक भाषणे देऊन आणि सभागृहात राहुल गांधींची जात विचारून तुमचे चारित्र्य पुन्हा दाखवून देत आहात. कारण तुमच्या पक्षात यासाठी तुमचा उपयोग केला जात आहे. अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे.
ट्विट करत सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले आहे की, ‘”तुम्हाला राहुल गांधींची जात जाणून घ्यायची आहे? या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कोणाचे पणजोबा साडेनऊ वर्षे तुरुंगात राहिले? कोणाच्या आजोबांनी या देशासाठी बलिदान दिले? कोणाचे आजी आणि वडील या देशासाठी शहीद झाले?” एका स्त्रीने इतके चारित्र्य हनन होऊनही या देशासाठी स्वत:चे आयुष्य समर्पित कले ती कोणाची आई आहे, असे सवालही उपस्थित करत भाजप आणि अनुराग ठाकूर यांना सुनावले आहे.
तसेच, ‘राहुल गांधींची जात कोणाकडे जाऊन विचारायची असेल तर, जा आणि रामशेत मोचीला विचारा, भाजी विक्रेत्या रामेश्वरला विचारा, निर्भयाच्या आईला विचारा, हाथरसच्या गुडिया (मुलीच्या) कुटुंबाला विचारा, शहीद अग्निवीरांच्या कुटुंबाला विचारा, विचारा त्या करोडो दलित वंचितांना, आदिवासींना, मागासलेल्यांना विचारा, एक गोष्ट लक्षात ठेवा, राहुल गांधी आणि भारत आघाडीने ठरवले आहे की जात जनगणना होणारच, असे ट्विट करत सुप्रिया श्रीनेत यांनी भाजप खासदार अनुराग ठाकूर यांना उत्तर दिले आहे.