Cyclone Fengal
बंगळुरू आणि दक्षिण कर्नाटकातील इतर भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. फेंगल चक्रीवादळाचा परिणाम बंगळुरुमध्ये होताना पहायला मिळत आहे. भारतीय हवामान खात्याने आज बंगळुरु आणि दक्षिण कर्नाटकातील इतर भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 30 नोव्हेंबरच्या रात्री फेंगल चक्रीवादळाने तामिळनाडू किनारपट्टीवर धडक दिली. तेव्हापासून बंगंळुरुमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
देशासंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
IMD ने बेंगळुरू आणि आसपासच्या परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडून नये, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. अतिवृष्टीचा इशारा असूनही, बंगळुरूमधील शाळा आणि महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरू आहेत. शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर संबंधित पालक आणि रहिवाशांकडून आक्रोश निर्माण झाला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)
IMD नुसार, 5 डिसेंबरपर्यंत शहरातील वेगळ्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
केंद्रशासित प्रदेश आणि तामिळनाडूमधील इतर ठिकाणांवर फेंगल चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून लष्कराने पूरग्रस्त रस्त्यावर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. फेंगल चक्रीवादळाचा जोर आता काहीसा कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्याचा परिणाम अजूनही लोकांवर होत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी सांगितले की, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या उत्तर किनाऱ्यावरील चक्रीवादळ फेंगल, गेल्या सहा तासांत 7 किमी/तास वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकले आणि 1 डिसेंबर (रविवार) रोजी रात्री 11.30 वाजता ते केंद्रस्थानी होते.
आयएमडी बंगळुरूचे संचालक सीएस पाटील यांनी सांगितले की, “पुढील तीन दिवस शहरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, दक्षिण कर्नाटकातील अंतर्गत भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात उत्तरेला काही ठिकाणी हलका पाऊस पडेल.” सततच्या मुसळधार पावसामुळे, IMD ने दक्षिण कन्नड, उडुपी, शिवमोग्गा, चिक्कमगालुरू, हसन, कोडागु, म्हैसूर आणि चामराजनगरसह अनेक जिल्ह्यांसाठी 2 आणि 3 डिसेंबरसाठी यलो अलर्ट जारी केला.
महाराष्ट्रासंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
पुडुचेरी सरकारने आज सोमवारी केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. कुड्डालोर आणि विल्लुपुरम जिल्ह्यातही शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. संततधार पावसामुळे तामिळनाडू सरकारने एकट्या वेल्लोर आणि राणीपेट येथील शाळांना सुट्टी जाहीर केली होती.
तिरुवन्नमलाई आणि तिरुपत्तूर जिल्ह्यांनीही शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. कृष्णागिरी, धर्मापुरी, सालेम जिल्ह्यांनीही सोमवारी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मद्रास विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाने सोमवारी होणारी परीक्षा पुढे ढकलल्याचे सांगितले आहे. सुधारित तारीख नंतर कळविण्यात येईल.
फेंगल चक्रीवादळामुळे चेन्नई आणि तिरुपतीमधील खराब हवामानामुळे शनिवारी दुस-या दिवशी हैदराबादला जाणारी आणि तेथून येणारी उड्डाणे रद्द करण्यात आली होती. याबाबत विमानतळ प्रशासनाने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली होती. चेन्नई विमानतळाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले होते की, फेंगल चक्रीवादळाचा परिणाम उड्डाणांवर देखील झाला. हैदराबाद ते चेन्नई आणि हैदराबाद ते तिरुपती हे दुसरे विमान शनिवारी रद्द करण्यात आले. याव्यतिरिक्त, चेन्नईहून येणारी दोन उड्डाणे रद्द करण्यात आली.