नवी दिल्ली : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याची भारतासह इतर देशांतही मोठी दहशत आहे. 70 च्या दशकात मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये दाऊदचे नाव वेगाने पुढे येऊ लागले. दाऊद इब्राहिम (Don Dawood Ibrahim) यापूर्वी हाजी मस्तान गँगमध्ये (Haji Mastan Gang) काम करत होता. तिथे राहत असताना त्याचा प्रभाव वाढू लागला. लोक त्याच्या टोळीला डी-कंपनी म्हणू लागले. त्यानंतर दाऊदलाच डी-कंपनीचे प्रमुख मानले जात असे. सगळ्यांना धडकी भरायला लावणारा दाऊऊ इब्राहिम चळचळा कापतो, असंही एक नाव आहे.
डॉन दाऊद इब्राहिमची चांगलीच दहशत आहे. दाऊद इब्राहिमचे मुंबई अंडरवर्ल्डमधील अनेक गुंडांशी मैत्री आणि शत्रुत्व आहे. पण डी-कंपनीचा डॉन लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला दाऊद इब्राहिम मुंबईबाहेर भेटला होता. पण सध्या दाऊद इब्राहिम हा चळपळा कापतो असं एक नाव आहे ते म्हणजे बबलू श्रीवास्तव. दाऊदने यापूर्वी उत्तर प्रदेशातील अनेक गुंडांशी हातमिळवणी केली होती आणि नंतर त्यांच्याशीच शत्रुत्व केले. त्यापैकी एक म्हणजे बबलू श्रीवास्तव.
याबाबत माजी आयजी राजेश पांडे यांनी म्हटले की, ‘आजही दाऊदला जर कोणाकडून जीवाला धोका असेल तर तो बबलूपासूनच आहे. यामुळे तो आता पाकिस्तानात कमी राहतो. फक्त अधूनमधून तो पाकिस्तानात जातो. दाऊद हा पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या रक्षणाखाली फक्त कराची आणि इस्लामाबादमध्येच राहतो, असं म्हणणं चुकीचं आहे. दाऊद हा पाकिस्तानच्या बाहेरही जात असतो. त्याच्याकडे अनेक बनावट पासपोर्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
बबलूला 1995 मध्ये केले होते तडीपार
बबलू श्रीवास्तव याला 1995 मध्ये सिंगापूरमधून भारतात पाठवण्यात आले होते. त्याच्यावर कस्टम अधिकारी एलडी अरोरा यांच्या हत्येचा आरोप होता. अरोरा हे मुंबईतील कस्टममध्ये कार्यरत होते. मात्र, त्यांची जेव्हा अलाहाबादला बदली झाली, तिथेच त्यांची हत्या झाली. याप्रकरणात बबलू याला तडीपार करण्यात आले होते.