रेखा गुप्ता यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ (फोटो- ANI)
Rekha Gupta Facilities: अखेर दिल्लीत 27 वर्षांनी भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या रेखा गुप्ता या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री झाल्या आहेत. रेखा गुप्ता यांनी रामलीला मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर १२ दिवसांनी दिल्लीला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. रामलीला मैदानावर होणाऱ्या शपथविधीची सोहळा पार पडला असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त, सर्व प्रमुख केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते आणि अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होती. दरम्यान मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची सुरक्षा, त्यांना मिळणाऱ्या सुविधा याबद्दल जाणून घेऊयात.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवीन मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा संपली आहे. रेखा गुप्ता (Delhi CM Rekha Gupta) यांनी गुरुवारी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी रामलीला मैदानावर त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी रेखा गुप्ता भगव्या साडीत दिसल्या. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. त्यांच्या आधी आतिशी, शीला दीक्षित आणि सुषमा स्वराज दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री राहिल्या आहेत. रेखा गुप्ता या शालीमार बागच्या आमदार आहेत. त्यांनी तीन वेळा आम आदमी पक्षाच्या आमदार बंदना कुमारी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना दरमहा किती पगार मिळणार?
2023 पासून दिल्लीतील आमदार आणि मुख्यमंत्री यांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना बेसिक वेतन हे 60 हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे. दरमहा बेसिक पगार आणि अन्य सुविधा मिळून 1. 70 लाख रुपये मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय डेली अलाऊन्स देखील मिळणार आहे. सरकारी वाहन आणि हेलिकॉप्टर अशा सुविधा देखील मिळणार आहेत.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना कोणत्या सुविधा मिळणार?
रेखा गुप्ता यांना राहण्यासाठी सरकारी निवासस्थान दिले जाईल. मात्र त्या अरविंद केजरीवाल रात असलेल्या निवासस्थानामध्ये राहणार नाहीत असे म्हटले जात आहे. सरकारी वाहनात दरमहिन्यास 700 लीटर पेट्रोल-डिझेल मिळणार आहे. रेखा गुप्ता यांनी स्वतःचे वाहन वापरल्यास त्यासाठी त्यांना 10 हजार रुपये दिले जातील. तसेच अन्य सुविधा देखील मिळणार आहेत.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना कशी असणार सुरक्षा व्यवस्था?
रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. केंद्र सरकारने त्यांना झेड सुरक्षा पुरवली आहे. दिल्ली पोलिसांचे कडे त्यांच्याभोवती असणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत यलो बुक नुसार त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. या सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत त्यांच्या सुरक्षेसाठी 22 जवान तैनात असणार आहेत.