बिहारमध्ये निवडणूक प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस खुर्चीतून खाली पडले
Devendra Fadnavis Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील बिहारमध्ये दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी काल बिहारच्या खडगिया जिल्ह्यात निवडणूक प्रचार केला. पण याच दरम्यान एक मोठी घटना घडली. देवेंद्र फडणवीस आणि चिराग पासवान प्रचारसभेदरम्यान मंचारवर दाखल झाले. पण खूर्चीत बसताना देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची अचानक तुटली. यामुळे मंचावर थोडावेळ गोंधळ उडाला. पण नंतर फडणवीस आणि चिराग पासवान यांनी अभिवादन करत सुरक्षित असल्याचे सांगितले. . त्यानंतर दुसरी खुर्ची मागवण्यात आली. त्यानंतर सभा पुन्हा सुरू करण्यात आली, पण हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता.
बिहार निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील एनडीएच्या प्रचारमोहिमेला वेग आला आहे. रविवारी खगडिया जिल्ह्यातील परबत्ता विधानसभा क्षेत्रात एनडीए उमेदवार बाबूलाल शौर्य यांच्या समर्थनार्थ प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या या सभेदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान मंचावर दाखल झाले. मुख्यमंत्री फडणवीस मंचावर खुर्चीवर बसताना खुर्ची अचानक तुटली.
फडणवीस यांची खुर्ची तुटल्याने काही वेळासाठी गोंधळ झाला. पण सुरक्षा रक्षकांनी लगेच परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत कोणालाही काही दुखापत झाली नाही. आयोजकांनी त्वरीत नव्या खुर्च्या आणल्या आणि कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. भाषणादरम्यान बोलताना फडणवीस म्हणाले,परबत्ता : “बिहारची जनता आता विकासाची अपेक्षा करते आणि ती दिशा केवळ एनडीए देऊ शकते. महागठबंधनने गेल्या काळात फक्त भ्रष्टाचार आणि घराणेशाही वाढवली आहे,” असा हल्लाबोल एनडीए नेत्यांनी प्रचारसभेत केला.
Bihar Election 2025: बिहारच्या निवडणुकीमध्ये आश्वासनांचा पाऊ
तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले, “महागठबंधन ही केवळ सत्तेसाठी तयार केलेली संधीसाधू आघाडी आहे. या आघाडीला जनतेच्या हिताशी काहीही देणेघेणे नाही,”स्थानिक नागरिकांनी सांगितले की, मंचावरील एका खुर्ची तुटल्याचा आवाज होताच काही क्षणांसाठी सगळ्यांनी श्वास रोखला; मात्र लगेचच परिस्थिती नियंत्रणात आली. नेत्यांच्या विनोदी स्वभावामुळे वातावरण पुन्हा हलकेफुलके आणि आनंदी बनले.
या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे कार्यक्रमानंतर काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाली. काही युझर्सनी आयोजकांच्या मंच व्यवस्थेतील निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणूक प्रचारसभांमध्ये अशा तांत्रिक आणि सुरक्षा त्रुटी गंभीर ठरू शकतात, कारण त्यातून नेते आणि जनतेचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. तरीदेखील या छोट्याशा घटनेने परबत्ता मतदारसंघातील एनडीएच्या प्रचाराला नवचैतन्य मिळाले आहे.






