आज देशभरात नवीन वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सगळे नववर्षाच्या स्वागतामध्ये गुतंले असताना दिल्ली मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली (Delhi) आणि आसपासच्या परिसरात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले. रिश्टर स्केलवर या भूंकपाची तिव्रता 3.8 इतकी मोजण्यात आली.
[read_also content=”भारत-चीन सीमेची अजिबात चिंता नाही, 1 इंच जमिनीवरही कोणी कब्जा करू शकत नाही; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टच सांगितलं https://www.navarashtra.com/india/amit-shah-on-india-china-border-and-itbp-jawan-358315.html”]
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (National center for seismology) या संदर्भात ट्विट करत ही माहिती दिली. मात्र या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. विशेष म्हणजे भूकंप झाला, तेव्हा लोक नववर्षाच्या जल्लोषात मग्न झाले होते.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील झज्जर येथे होता. त्याची खोली जमिनीपासून 5 किलोमीटर खाली होती. दरम्यान, पहाटे 1.19 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सद्यस्थितीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. गेल्या काही महिन्यांत दिल्लीत अनेकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत.
Earthquake of Magnitude:3.8, Occurred on 01-01-2023, 01:19:42 IST, Lat: 28.71 & Long: 76.62, Depth: 5 Km ,Location: 12km NNW of Jhajjar, Haryana for more information Download the BhooKamp App https://t.co/QVSUrTSmuX pic.twitter.com/SAgjRl6hNo
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) December 31, 2022