संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

विद्यार्थिनींना मंगळसूत्रासह कानातले, चेन आणि जोडवे असे दागिने काढण्यास सांगितले होते.

    कर्नाटक नागरी सेवा परीक्षेदरम्यान (Karnataka civil services exam Controversy) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्नाटक नागरी सेवा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थिनींना मंगळसूत्र काढण्यास सांगण्यात आले. तर,  हिजाब परिधान करून परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली. या घटनेने नवा वाद निर्माण झाला आहे.

    विद्यार्थिनींना मंगळसूत्रासह कानातले, चेन आणि जोडवे असे दागिने काढण्यास सांगितले होते. त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले की, जर त्यांना परीक्षा हॉलमध्ये जायचे असेल तर ती कोणतेही दागिने घालू जाता येणार नाही. या सगळ्या वादात भाजपने उडी घेतली असून भारतीय जनता पक्षाचे आमदार बसनगौडा यत्नल यांनी हे पाऊल केवळ हिंदूंसाठी आहे का, असा सवाल केला आहे.

    हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींची तपासणी करुन आत जाऊ दिलं

    ज्या विद्यार्थिनींना त्यांचं मंगळसूत्र काढण्यास सांगितले होते त्यापैकी एका विद्यार्थिनीने सांगितले की, अधिकाऱ्यांनी हिजाब घातलेल्या महिलांचीही तपासणी केली, परंतु त्यांना आत जाऊ दिले. विद्यार्थिनीने सांगितले की, “हिंदू संस्कृतीत विवाहित महिला सर्व वेळ मंगळसूत्र घालते. मला मंगळसूत्र काढण्यास सांगण्यात आले. मी माझे मंगळसूत्र काढले आणि आत गेले. त्यांनी ज्या प्रकारे हिजाब तपासला आणि परवानगी दिली, त्यांची आम्हालाही तपासणी करून आत जाऊ द्यायला हवं होतं.

    केईए परीक्षेत काही विद्यार्थी फसवणूक करताना पकडले गेल्यानंतर काही दिवसांनी हा वाद समोर आला आहे. KEA द्वारे विविध बोर्ड आणि कॉर्पोरेशनमधील पदे भरण्यासाठी उमेदवारांची भरती केली जाते. परीक्षा हॉलमध्ये ब्लूटूथ उपकरण वापरताना विद्यार्थी पकडले गेले. आता नव्याने हे प्रकरण समोर आले आहे.