Todays Gold Price: दिवळीत सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात किंचीत घसरण
Todays Gold Price: आज 2 नोव्हेंबर राजी भारतात सोन्याची किंमत 22 कॅरेट सोन्यासाठी 7,384 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी किंमत 8,055 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर काल 1 नोव्हेंबर रोजी भारतात सोन्याची किंमत 22 कॅरेट सोन्यासाठी 7,456 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 8,134 रुपये प्रति ग्रॅम होती. तसेच काल 1 नोव्हेंबर रोजी भारतात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,560 रुपये होता. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 81,340 रुपये होता.
हेदेखील वाचा- Todays Gold Price: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोनं चकाकलं, ऐन सणासुदीत वाढले दर! वाचा आजचा भाव
आज भारतात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,840 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,550 रुपये आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. ही सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी असते. त्यामुळे सोन्याच्या दरात सतत वाढ देखील होत असते. मात्र आता सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ऐन सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी 7,384 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 8,055 रुपये प्रति ग्रॅम आहे.(फोटो सौजन्य – pinterest)
तर काल 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी 7,456 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 8,134 रुपये प्रति ग्रॅम होता. मुंबईत काल 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,560 रुपये होता. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 81,340 रुपये होता. आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,840 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,550 रुपये आहे.
हेदेखील वाचा- Todays Gold Price: दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? आजची किंमत जाणून घ्या
भारतात आज चांदीची किंमत 96.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 96,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. भारतातील चांदीची किंमत आंतरराष्ट्रीय किमतींनुसार ठरवली जाते. काल 1 नोव्हेंबर रोजी भारतात चांदीची किंमत 99.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 99,900 रुपये प्रति किलोग्राम होती. मुंबईत आज चांदीचा भाव 96.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 96,900 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. मुंबईतील चांदीचे दर गेल्या काही वर्षांपासून कमी आहेत. मुंबईत काल चांदीचा भाव 99.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 99,900 रुपये प्रति किलोग्रॅम होता.
दिल्लीत आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी 7,399 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 8,070 रुपये आहे. दिल्लीत सोन्याच्या दरात वर्षाच्या सुरुवातीपासूनच काहीशी तेजी पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे, वर्षाच्या सुरुवातीला इक्विटी मार्केटला धक्का बसला, ज्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यासारख्या सुरक्षित हेवन मालमत्तेत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. गेल्या काही वर्षांत मौल्यवान धातू कदाचित आवडते नसतील, कारण किंमती घट्ट श्रेणीत गेल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीला इक्विटीच्या किमतीत घट झाल्याने गुंतवणूक म्हणून सोन्याकडे काही आकर्षण निर्माण झाले. दिल्लीत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,990 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,700 रुपये आहे.