Todays Gold-Silver Price: ख्रिसमसवर सोनं गगनाला भिडलं! तुमच्या शहरातील सोन्याचे भाव जाणून घ्या सविस्तर (फोटो-सोशल मीडिया)
Todays Gold-Silver Price: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढताना दिसत आहे. सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या किमती गगनाला भिडत असून ग्राहकांची चिंता वाढली आहे. २५ डिसेंबरला ख्रिसमसच्या दिवशी सोन्याच्या दराने उसळी मारली आहे. चांदीने देखील २ लाखांचा टप्पा ओलांडला असून अडीच लाखांच्या उंबऱ्यावर पोहोचत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताची राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,३९,४०० ला विकले जात असून २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,२७,८०० रु. वर आहेत. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,३९,२५० रु. विकले जात असून २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,२७,६५० रु. वर आहे.
जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि तुमच्या खरेदीवर सर्वोत्तम डील मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या शहरातील नवीनतम किमती तपासल्या पाहिजेत.
तुमच्या शहरातील सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
| शहर | २४ कॅरेट (रुपये) | २२ कॅरेट (रुपये) | १८ कॅरेट (रुपये) |
|---|---|---|---|
| पुणे | १,४०,७३९ रु. | १,२९,०१५ रु. | १,०४,३२५ रु. |
| मुंबई | १,३९,२५० रु. | १,२७,६५० रु. | १,०४,४४० रु. |
| दिल्ली | १,३९,४०० रु. | १,२७,८०० रु. | १,०४,५९० रु. |
| चेन्नई | १,३९,८६० रु. | १,२८,२०० रु. | १,०६,९५० रु. |
| कोलकाता | १,३९,२५० रु. | १,२७,६५० रु. | १,०४,४४० रु. |
| अहमदाबाद | १,३९,३०० रु. | १,२७,७०० रु. | १,०४,४९० रु. |
| लखनऊ | १,३९,४०० रु. | १,२७,८०० रु. | १,०४,५९० रु. |
| पाटणा | १,३९,३०० रु. | १,२७,७०० रु. | १,०४,४४० रु. |
हेही वाचा: India–Bangladesh Relations: भारत–बांगलादेश संबंधात तणाव; बांगलादेश भारतावर कशासाठी अवलंबून आहे?
आज २५ डिसेंबरला मुंबईत चांदीची किंमती २ लाखांच्या पार गेली आहे. मुंबईतील आजचे चांदीचे दर प्रति १० ग्रॅम २,३४० रुपये असून प्रति १ किलो चांदी २,३४,००० रुपयांवर पोहोचली आहे. आज चांदीच्या दरात कालच्या तुलनेत प्रति किलो १,००० रुपयांची वाढ झाली आहे. सोने आणि चांदीचे दर सातत्याने वाढत असल्याने गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. येत्या काही दिवसात धातूंचे भाव कसे असतील याकडे व्यापारांचे लक्ष आहे.






