Todays Gold Price: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोनं चकाकलं, ऐन सणासुदीत वाढले दर! वाचा आजचा भाव
दिवाळीच्या मूहूर्तावर आणि सणासुदीच्या काळात आता सोन्याच्या दरात वाढ होताना पाहायला मिळत आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सणासुदीत सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. आज भारतात सोन्याची किंमत 22 कॅरेट सोन्यासाठी 7,456 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 8,134 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज भारतात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,560 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 81,340 रुपये आहे.
हेदेखील वाचा-Todays Gold Price: दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? आजची किंमत जाणून घ्या
मुंबईत आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी 7,456 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 8,134 रुपये प्रति ग्रॅम आहे. मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,560 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 81,340 रुपये आहे. काळात सोन्या-चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र आता सोन्याच्या सततच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. ठाणे शहरात आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी 7,456 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 8,134 रुपये प्रति ग्रॅम आहे. ठाणे शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,560 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 81,340 रुपये आहे.
सोन्या-चांदीची मागणी झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या वाढत्या दरांमुळे सोनं कसं खरेदी करायचं, अशा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा आहे. भारतात आज चांदीची किंमत 99.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 99,900 रुपये प्रति किलोग्राम आहे.भारतातील चांदीची किंमत आंतरराष्ट्रीय किमतींनुसार ठरवली जाते, जी दोन्ही दिशेने फिरते. त्याशिवाय ते डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या चलन चलनावरही अवलंबून असते. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आणि आंतरराष्ट्रीय किमती स्थिर राहिल्यास चांदी आणखी महाग होईल.
हेदेखील वाचा-भारतीय व्यक्ती दुबईमधून किती सोनं आणू शकतो? काय सांगतात नियम, जाणून घ्या
मुंबईत आज चांदीची किंमत 99.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 99,900 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. मुंबईतील चांदीचे दर गेल्या काही वर्षांपासून कमी आहेत. लेहमन ब्रदर्सचे संकट उद्भवले तेव्हापासून, 2008 नंतर चांदीचे दर वाढले आणि सतत तेजी आली. तथापि, गेल्या काही वर्षांमध्ये ते कोठेही गेलेले नाही. गुंतवणूकदारांनी 2016 आणि 2017 मध्ये समभागांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे, शेअर्स नवीन उच्चांकावर नेले आहेत. तथापि, 2018 मध्ये, मुंबईतील सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसून आली.
मिस्ड कॉलद्वारे तुम्ही सोन्या-चांदीची किंमत देखील तपासू शकता. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. काही वेळात तुम्हाला एसएमएसद्वारे दराची माहिती मिळेल. त्याच वेळी, तुम्ही अधिकृत वेबसाइट ibjarates.com वर जाऊन सकाळ आणि संध्याकाळचे सोन्याचे दर अपडेट जाणून घेऊ शकता.