फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतेक मध्य प्रदेशातील कामगार (फोटो सौजन्य-X)
गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील एका फटाक्याच्या कारखान्यात मंगळवारी (१ एप्रिल) भीषण आग लागली आणि इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. या अपघातामघ्ये १८ कामगारांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात पाच जण जखमी झाले आहेत, ज्यांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना डीसा शहराजवळील युनिटमध्ये घडली. या घटनेसंदर्भात दीसा उपविभागीय दंडाधिकारी नेहा पांचाळ यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे आग लागली आणि इमारतीचे काही भाग कोसळले. ज्यामुळे अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
बनासकांठा जिल्ह्यातील डीसा शहरातील धुनवा रोडवर हा कारखाना आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या या भीषण अपघाताने अनेक किलोमीटरच्या परिघात लोकांना हादरवून टाकले. १७ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो असे सांगितले जात आहे. १७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि ४ जण गंभीर जखमी आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेच्या वेळी तिथे 30 कामगार काम करत होते.
अपघातातील मृत आणि जखमी कामगार मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची माहितीही येत आहे आणि ते सर्वजण दोन दिवसांपूर्वीच कामावर गेले होते. ज्या एमपी जिल्ह्यातील हे कामगार राहतात त्या जिल्ह्यातील प्रशासन मृतांची ओळख पटवण्यात व्यस्त आहे. बनासकांठा एसडीएम नेहा पांचाळ यांच्या मते, स्फोटामुळे कारखान्याचा स्लॅब कोसळला, ज्यामुळे अनेक लोक आतच राहिले. बचावकार्य सुरू आहे.
फटाक्याच्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर कारखान्यात मोठे स्फोट सुरू झाले. स्फोट इतके भयानक होते की आजूबाजूच्या शेतातही मृतदेहांचे तुकडे विखुरले होते. या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व लोक मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत. स्फोट इतके शक्तिशाली होते की काही किलोमीटर अंतरावर लोक घाबरले.
हा कारखाना खुबचंद सिंधी नावाच्या व्यक्तीचा आहे. फटाके विकण्याचा परवाना होता, तर येथे फटाकेही तयार केले जात होते. स्फोटानंतर कारखाना मालक फरार झाला आहे. ज्या कारखान्यात स्फोट झाला त्याचे नाव दीपक ट्रेडर्स आहे.