I Dont Feel Bad About My Actions Says Lawyer Rakesh Kishore
‘मला वाईट वाटत नाही, देवाने हे सर्व…’; सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचे धक्कादायक विधान
सरन्यायाधीशांनी त्यांच्या संवेदनशीलतेवर काम करण्याची गरज आहे. लाखो खटले प्रलंबित आहेत. मी कोणाचीही माफी मागणार नाही आणि मला वाईटही वाटत नाही. मी असे काहीही केले नाही.
'मला वाईट वाटत नाही, हे सर्व...'; सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचे धक्कादायक विधान
Follow Us:
Follow Us:
नवी दिल्ली : सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयातवकील राकेश किशोर यांनी हा बूट फेकल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. असे असताना वकील राकेश किशोर यांनी मात्र धक्कादायक विधान केले आहे. सरन्यायाधीशांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्याबाबत हा प्रकार घडला. ‘मला माझ्या कृतीबद्दल कोणताही भेद अथवा पश्चात्ताप नाही’, असे त्यांनी म्हटले आहे.
नाराजी व्यक्त करताना वकील राकेश किशोर म्हणाले की, ‘सनातन धर्माशी संबंधित प्रकरणे उद्भवल्यास सर्वोच्च न्यायालय असेच आदेश जारी करते. मला माझ्या कृत्याबाबत कोणताही खेद नाही. मी मद्यधुंद नव्हतो. त्यांच्या ‘अॅक्शनवर माझी रिअॅक्शन’ होती. मला माझ्या कृतीची भीती किंवा पश्चात्ताप नाही. 16 सप्टेंबर रोजी सरन्यायाधीशांच्या न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. सरन्यायाधीशांनी मूर्तीसमोर प्रार्थना करा, असे त्यांनी म्हटले होते.
सरन्यायाधीश हे धर्माच्या विरोधात असल्याचे दिसून आले आहे. उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे रेल्वे जमिनीवर विशेष समुदायाचा कब्जा आहे. जेव्हा ते हटवण्याची मागणी झाली तर सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. मागील तीन वर्षांपूर्वी ही स्थगिती देण्यात आली होती. अद्यापही स्थगिती कायम आहे’.
दरम्यान, आमच्या सनातन धर्माविषयी विषय येतो तेव्हा जलीकट्टू असो दहीहंडी असो कोणताही छोटा-मोठा मुद्दा असो त्यावर महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालय घेते. मात्र, न्यायालयाने असे करायला नको होते. यामुळेच मी दु:खी आहे. व्यक्तीला दिलासा द्या किंवा देऊ नका. मात्र, त्याची चेष्टा करू नका. मीदेखील हिंसेच्या विरोधात आहे. माझ्याविरोधात कोणताही गुन्हा नाही. ना कोणासोबतही संबंध नाहीत. पण, मला माझ्या कृत्यावर खेद नाही.
संवैधानिक पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे
तसेच इतके उच्च संवैधानिक पद भूषवणाऱ्या सरन्यायाधीशांनीही विचार करावा. त्यांनी ‘माय लॉर्ड’ या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा आणि त्याची प्रतिष्ठा राखावी. तुम्ही मॉरिशसमध्ये जा आणि तिथे म्हणा की देश बुलडोझरने चालवता येत नाही. मी सरन्यायाधीशांना विचारू इच्छितो की, सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध योगी आदित्यनाथ यांनी केलेली कारवाई चुकीची आहे का? पण, मला वाईट वाटले.
‘देवाने मला हे सर्व करायला लावले’
वकील राकेश किशोर म्हणाले, ‘सरन्यायाधीशांनी त्यांच्या संवेदनशीलतेवर काम करण्याची गरज आहे. लाखो खटले प्रलंबित आहेत. मी कोणाचीही माफी मागणार नाही आणि मला वाईटही वाटत नाही. मी असे काहीही केले नाही. तुम्ही मला प्रश्न विचारत आहात, पण देवाने मला हे सर्व करायला लावले’.
Web Title: I dont feel bad about my actions says lawyer rakesh kishore