अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- ani)
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. राजधानी दिल्लीमध्ये देखील जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे दिल्लीतील अनेक भागात पाणी भरल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान आज भारतीय हवामान विभागाने राजधानी दिल्ली सह अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट दिलेला आहे.
दिल्लीत कसे असणार वातावरण?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज दिल्लीमध्ये ढगाळ वातावरण राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. अनेक भागात जोरदार पाऊस होऊ शकतो.
राजस्थानमध्ये पावसाची विश्रांती
राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. अनेक नद्या दुथडी भरून वाहत होत्या. जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र आज येथे पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान आज हवामान विभागाने राजस्थानमध्ये कोणताही अलर्ट जारी केलेला नाही.
पर्वतीय राज्यांना ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार आज पर्वतीय राज्यांमध्ये व आसपासच्या राज्यांमध्ये प्रचंड पाऊस होण्याचा अंदाज आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तराखंड राज्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये म्हणजेच आसाम मेघालय मध्ये देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बिहार, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र कोकण आणि गोवा तसेच तेलंगणा राज्यांना देखील हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, कोकण, गोवा कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीप या ठिकाणी मध्यम ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो.
हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; तब्बल 435 रस्ते बंद, 125 हून अधिक नागरिकांचा मृत्यू
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस होत आहे. पुढील चार दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ मराठवाडा भागांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अति ते अति मुसलमान पावसाचा उसाला देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार
देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. महाराष्ट्र, दिल्लीसह हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस झाला. त्यात हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेला चंदीगड-मनाली महामार्ग बंद करावा लागला. मंडी जिल्ह्यातील धोकादायक परिस्थितीमुळे हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशात 125 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.