सिंधु जल करार स्थगितीला पाकिस्तान आव्हान देणार ? (फोटो - टीम नवराष्ट्र)
नवी दिल्ली: टीआरएफ या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये सुमारे 28 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी देशभरातून होत आहे. संताप व्यक्त केला जात आहे. भारताने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे.भारताने सिंधु जल करार स्थगित केला आहे. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली आहे.
भारताने सिंधु जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानची कोंडी झाली आहे. पाकिस्तानकडून भारताला धमक्या दिल्या जात आहेत. सिंधु जल करार स्थगित केल्याने भारताने पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. कारण बराचसा पाकिस्तानचा भाग हा सिंधु नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे.
पाकिस्तान सिंधु जल करारावरील स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. यासाठी पाकिस्तानकडे तीन पर्याय उपलब्ध आहेत. पाकिस्तानमधील 80 टक्के शेती सिंधु नदीच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे पाहायला मिळते. पाकिस्तान स्थगिती उठवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तान हा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे.
1960 मध्ये सिंधु जल करार भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झाला होता. जागतिक बँकेच्या मदतीने हा करार करण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तान कदाचित हे प्रकरण वर्ल्ड बँकेत देखील घेऊन जाण्याची शक्यता आहे. किंवा तिसरा पर्याय म्हणजे युनायटेड नेशन्समध्ये जाण्याची शक्यता आहे.