Photo Credt- Social Media
India-Pakistan Conflict : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने जगातील देशांना भारतासोबत शांतता आणि सलोख्याचे आवाहन केले होते. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टद्वारे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा दावा केला.ट्रम्प यांच्या या विधानाला भारत सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दुजोरा दिला आहे. तथापि, भारत सरकारने स्पष्ट केले की भारत आणि पाकिस्तानमधील गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय थेट दोन्ही देशांमधील चर्चेतून घेण्यात आला होता.
यानंतर तीनही दलाच्या अधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली, यावेळी बोलताना लेफ्टनंट जनरल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, पाकिस्तानने आपल्या जेएफ १७ ने आमच्या एस४०० आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र तळांना नुकसान पोहोचवल्याचा दावा केला आहे, जो पूर्णपणे चुकीचा आहे.
India-Pakistan ceasefire : भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी, भारत सरकारने केली मोठी घोषणा
दुसरे म्हणजे, त्यांनी सिरसा, जम्मू, पठाणकोट, भटिंडा, नालिया आणि भूज येथील आमच्या हवाई तळांचे नुकसान झाल्याची चुकीची माहिती देणारी मोहीम देखील चालवली आणि ही माहिती देखील पूर्णपणे खोटी आहे.
तिसरे म्हणजे, पाकिस्तानच्या चुकीच्या माहितीच्या मोहिमेनुसार, चंदीगड आणि व्यास येथील आमच्या दारूगोळा डेपोचे नुकसान झाले, जे देखील पूर्णपणे खोटे आहे.
भारतीय सैन्याने मशिदींचे नुकसान केल्याचा खोटा आरोप पाकिस्तानने केला. मी हे स्पष्ट करू इच्छिते की भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि आपले सैन्य हे भारताच्या संवैधानिक मूल्यांचे एक अतिशय सुंदर प्रतिबिंब आहे. भारतीय सशस्त्र दल भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत. आम्ही पूर्णपणे तयार आहोत.”
#WATCH | Delhi: Colonel Sofiya Qureshi says, “Pakistan claimed that it damaged our S400 and Brahmos missile base with its JF 17, which is completely wrong. Secondly, it also ran a misinformation campaign that our airfields in Sirsa, Jammu, Pathankot, Bhatinda, Nalia and Bhuj were… pic.twitter.com/QOVrDBH899
— ANI (@ANI) May 10, 2025
कर्नल सोफिया म्हणाल्या, “पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टम आणि रडार सिस्टमला निष्क्रिय करण्यात आले. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या कमांड अॅण्ड कंट्रोल लॉजिस्टिक सुविधांना, त्यांच्या लष्करी पायाभूत सुविधा आणि सैन्य दलांना इतकं नुकसान झालं की पाकिस्तानची आक्रमण क्षमता आणि बचावशक्ती पूर्णपणे नष्ट करण्यात आली. भारतीय सशस्त्र सेना पूर्णपणे सज्ज आणि सतर्क आहे. भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या संरक्षणासाठी पूर्णपणे समर्पित आहे.”
भारत-पाकिस्तान युद्धविरामासाठी तयार? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
कमोडोर रघु आर नायर म्हणाले की, भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहेत. आम्ही पूर्णपणे तयार आणि सतर्क आहोत. पाकिस्तानच्या कोणत्याही धाडसाला कडक प्रत्युत्तर देण्यात आले आहे, जर तणाव आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला गेला तर त्यांना निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल.