India-Russia Deal: अमेरिकेला दणका! भारताचा रशियासोबत प्रवासी विमान निर्मीतीचा ऐतिहासिक करार
India and Russia Deal: गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेतील व्यापारी संबंध चांगलेच ताणले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जवळपास ५० टक्के आयात शुल्क लादलं आहे. इतकचं नव्हे तर, भारताच्या व्यापार आणि आंतरराष्ट्रीय धोरणांवर सातत्याने टीका करत आहेत. याचा भारताला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटकाही बसला आहे. त्यातच भारताने रशियाकडून तेल आयात करू नये, यासाठी ट्रम्प सतत दबावही टाकत आहेत. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
भारत आणि रशिया यांनी विमाननिर्मिती क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (UAC) यांच्यात सुखोई सुपरजेट SJ-100 या नागरी विमानाच्या संयुक्त निर्मितीसाठी ऐतिहासिक करार झाला आहे.
या सामंजस्य करारानुसार दोन्ही देश नागरी विमान उद्योगातील सहकार्य वाढवणार आहेत. HAL आणि UAC यांच्या भागीदारीत तयार होणाऱ्या या प्रकल्पामुळे भारताला विमाननिर्मितीच्या क्षेत्रात स्वदेशी क्षमतांचा नवा टप्पा गाठता येणार आहे. या करारामुळे देशांतर्गत नागरी विमान वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती घडू शकते, तसेच “मेक इन इंडिया” उपक्रमाला देखील बळ मिळेल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
भारत आणि रशियामध्ये विमाननिर्मिती क्षेत्रात ऐतिहासिक सहकार्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (UAC) यांनी सुखोई सुपरजेट SJ-100 या नागरी प्रवासी विमानाच्या संयुक्त निर्मितीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
वृत्तानुसार, HAL आणि UAC यांच्या सहकार्यातून भारत आता SJ-100 नागरी विमानांचे उत्पादन सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट प्रादेशिक हवाई संपर्क वाढवणे आणि देशांतर्गत विमान उत्पादनाला चालना देणे हे आहे.
तज्ञांच्या मते, या उपक्रमामुळे भारतातील नागरी विमान वाहतूक उद्योगासाठी नवीन युगाची सुरूवात होईल. प्रादेशिक विमानांच्या वाढत्या मागणीची पूर्तता होईल तसेच देशातील तांत्रिक कौशल्य, रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधींनाही चालना मिळेल. हा करार “मेक इन इंडिया” आणि “आत्मनिर्भर भारत” या उपक्रमांना बळ देणारा ठरेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आज राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. या कराराच्या माध्यामातून भारताने पहिल्यांदाच संपूर्ण प्रवासी विमानाचं उत्पादन करण्यााचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यासंबंधी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे प्रभात रंजन आणि ओलेग बोगोमोलोव्ह यांच्या उपस्थित या भारत आणि रशिया सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
केंद्राच्या यूडीएएन योजनेअंतर्गत प्रादेशिक हवाई संपर्क वाढवण्यासाठी या निर्णयाला महत्त्वाची चाल मानली जात आहे. उद्योग तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पुढील दशकात भारताला प्रादेशिक हवाई प्रवासाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी या श्रेणीतील किमान २०० जेट्सची गरज भासेल. तसेच, हिंद महासागर क्षेत्रातील जवळच्या आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थळांना सेवा देण्यासाठी सुमारे ३५० अतिरिक्त विमानांची आवश्यकता राहील. त्यामुळे हा करार भारताच्या विमानवाहतूक क्षेत्रासाठी एक निर्णायक आणि दूरगामी पाऊल ठरणार आहे.






