राज्याच्या तिजोरीवर प्रचंड बोजा! लाडक्या बहिणीसाठी प्रत्येक वर्षी तब्बल 43 हजार कोटींचा खर्च
मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणीसाठी प्रत्येक वर्षी तब्बल 43 हजार कोटींचा बोजा सरकारी तिजोरीवर पडत असल्याची बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. योजनेची लोकप्रियता प्रचंड असल्याने अर्जदार महिलांची संख्या लाखोंमध्ये पोहोचली. निवडणुकीत महायुतीला याचा मोठा फायदा झाला आणि सत्तेची किल्ली मिळाली. मात्र, योजनेच्या खर्चामुळे राज्य तिजोरीवर प्रचंड ताण आला आहे.
आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहिती अधिकारातून योजना खर्चाची आकडेवारी उघड केली. जुलै २०२४ ते जून २०२५ या एका वर्षात तब्बल ४३,०४५.०६ कोटी रुपये वितरित झाले. यासाठी इतर विभागांच्या निधीतून कपात केल्याचा आरोप सातत्याने होत आहे. सरकारने योजनेचे नियम कडक केल्याने लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली. तरीही २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ३६,००० कोटींचा निधी आरक्षित ठेवला आहे. विरोधकांचा दावा आहे की, ही योजना निवडणुकीसाठीची लॉलीपॉप असून राज्याच्या विकासकामांवर परिणाम होत आहे.
दरम्यान, महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेत एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. १२,४३१ पुरुषांनी महिला असल्याचे भासवून या योजनेचा फायदा घेतला आहे. त्याच वेळी ७७,९८० अपात्र महिलांनीही फायदा घेतला आहे. एका माहिती अधिकारात हे उघड झाले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिनी योजना फक्त महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. पुरुषांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
अहवालानुसार, पुरुषांना दिलेल्या देयकामुळे अंदाजे ₹२४.२४ कोटींचे नुकसान झाले. दरम्यान, अपात्र महिलांना १२ महिन्यांसाठी देयके मिळाली, ज्यामुळे ₹१४०.२८ कोटींचा गैरव्यवहार झाला. एकूण ₹१६४.५२ कोटींचा गैरव्यवहार झाला. विभागाच्या मते, या अपात्र व्यक्तींना आता यादीतून काढून टाकण्यात आले आहे, परंतु त्यांच्याविरुद्ध वसुली किंवा कारवाईबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.






