फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: येत्या काही वर्षात भारत पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे. याच दरम्यान भारत आता सांस्कृतिक ‘सॉफ्ट पॉवर’ने जगाला आकर्षित करणार आहे. सध्या याची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. बारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने स्षष्ट केले आहे की, भारत विविध देशांशी सांस्कृतिक करार करुन संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलत आहे. यामुळे भारताचा विकासात वाढ होण्याची शक्यता आहे.
या उपक्रमांतकर्गत भारत विविध देशांमध्ये सांस्कृतिक उत्सवांचे आयोजन करणार
मिळालेल्या माहितीनुसरा, भारताचे सध्या एकूण 84 देशांसोबत सांस्कृतिक करार आहे. मात्र 2025 मध्ये भारत 100 देशांपर्यंत हा करार करणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्रालयाने दिली आहे. या उपक्रमांतकर्गत भारत विविध देशांमध्ये सांस्कृतिक उत्सवांचे आयोजन करणार आहे.
यामध्ये आपले नृत्य, संगीत, नाट्यगृहे, संग्रहालये, ग्रंथालये यांची ओळख जगाला करून देण्यात येणार आहे. भारताना आत्तापर्यंत 59 देशांमध्ये 62 भारत सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन केले आहे. यामुळे भारताची सांस्कृतिक शक्ती जगभरात पोहोचत आहे.
पर्यटन आणि इतर काही क्षेत्रांना चालना
सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यासंबंधात इतर देशांशी चर्चा सुर करण्यात आली आहे. यामुळे 2025 वर्ष भारतासाठी अधिक प्रगत असू शकते. या करारामुळे भारताच्या पर्यटनाल चालना मिळेल. एढेच नाही कर, आरोग्य, शिक्षण, वाणिज्य यांसारख्या क्षेत्रांनाही यामुळे चालना मिळेल.
दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे भारताला इतर देशांच्या उत्तम पद्धती शिकता येतील. विशेषतः संग्रहालये, अभिलेखागारे आणि पुरातत्व स्थळांचे संवर्धन करण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल. जगभरातील लोक सध्या बारतीय संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
भारताची नवीन विचारसरणी जगासमोर
या करारामुळे भारताची नवीन विचारसरणी जगासमोर येईल. तसेच कोरोनाच्या काळात भारताने जागतिक समुदायाला मदत करून आपली सकारात्मक प्रतिमा निर्माण केली होती. आता सांस्कृतिक ‘सॉफ्ट पॉवर’च्या माध्यमातून भारत जागतिक मंचावर नवी ओळख निर्माण करू पाहत आहे. ब्रिटनसारख्या देशांमध्ये रोड शो आयोजित करून भारताने आधीच या मोहिमेचा प्रारंभ केला आहे.
भारतातील विविधता, कला आणि संस्कृती यांची श्रीमंती जगभरातील देशांना आकर्षित करत आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने आखलेल्या या योजनांमुळे भारताची जागतिक प्रभावशक्ती अधिक दृढ होईल, तसेच भारत जगातील देशांसाठी प्रेरणादायक ठरेल.
या देशांसोबत आहे भारताचे सांस्कृतिक करार
भारताचे आत्तापर्यंत एकूण 84 देशांशी सांस्कृतिक करार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कंबोडिया, चीन, कोलंबिया, इजिप्त, फ्रान्स, बांगलादेश, कॅनडा, इटली, केनिया, मलेशिया, मालदीव, नॉर्वे, माली, मॉरिशस, रशिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, सौदी अरेबिया, युनायटेड किंगडम, यूएई, झिम्बाब्वे, युक्रेन यांचा समावोश आहे.