नवी दिल्ली: आज पहालगाम येथील दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा पूर्ण झाला आहे. पहलगाम येथे टीआरएफ या दहशतवादी संघटनेने हल्ला केला होता. भारत सरकारने अनेक धोरणात्मक पावले उचलून पाकिस्तान सरकारची कोंडी केली आहे. भारताने लष्करी युद्धाभ्यास सुरू केला आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी देशभरातून केली जात आहे. सिंधु जल करार स्थगित केल्यापासून पाकिस्तानची अडचण वाढली आहे. पाकिस्तान देखील आता थेट युद्ध करण्याची भाषा बोलून दाखवत आहे.
पाकिस्तान सरकारमधील अनेक मोठे मंत्री भारताशी युद्ध करण्याची भाषा बोलत आहेत. पाकिस्तानचे मंत्री अणुबॉम्बची धमकी देत आहेत. पाकिस्तानचे सैन्य अलर्ट मोडवर आले आहे. आर्मी, नौदल, वायुसेना सतर्क झाली आहे. सीमेजवळ हालचाली वाढल्या आहेत. अनेक मिसईल्स, रणगाडे सीमेजवळ तैनात करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानची लढाऊ विमाने सीमेजवळ घिरट्या घालत आहेत. मात्र भारताने देखील आक्रमण युद्धाभ्यास सुरू केला आहे. भारताकडे अशी तीन घातक शस्त्रे आहेत, ज्यामुळे पाकिस्तानची महत्वाची शहरे उद्ध्वस्त होऊ शकतात.
ब्रम्होस सुपरसोनिक मिसाईल्स
भारताकडे अनेक प्रकारची घातक मिसाईल्स आहेत. यातील ब्रम्होस सुपरसोनिक मिसाईलची रेंज 200 ते 700 किमी इतकी आहे. तीनही ठिकाणावरून शत्रूवर मारा करण्यास सक्षम आहे. पाकिस्तानचे लाहोर हे शहर अमृतसरपासून जवळ आहे. हे मिसाईलच्या गतीचा अंदज घेतल्यास 70 ते 72 सेकंदात लाहोर शहर टार्गेट करू शकते.
शौर्य मिसाईल
शौर्य मिसाईलची क्षमता 700 ते 1900 किमी आहे. त्याचे वजन 6.2 टन इतके आहे. याची मोबाइल लॉंच वाहनाने तैनात केली जातात. रडारला चकवा देत अचूक नेम साधण्यात सक्षम आहे. इस्लामाबाद आणि लाहोर शहरला हे मिसाईल टार्गेट करू शकतात.
प्रलय मिसाईल्स
प्रलय मिसाईल्स हे शॉर्ट बॅलेस्टिक मिसाईल आहेत. याची रेंज 150 ते 500 किमी इतकी आहे. प्रलय मिसाईल लाहोर शहराला 30 ते 40 सेकंदात टार्गेट करू शकते.
भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक
पाकिस्तानवर भारत अनेक प्रकरे कारवाई करत आहे. भारत सरकारने आता एक मोठे पाऊल उचले आहे. भारत सरकारने पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर बंदी घातली आहे. यासोबतच भारताने पहालगाम हल्ल्यातील आयएसपीआर आणि आयएसआयशी संबंधित अनेक पाकिस्तानी पत्रकरांच्या अकाऊंटवर बंदी घातली आहे.
Pahalgam Terror Attack: भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक; संरक्षणमंत्री अन्…
याधी भारताने पाकिस्तानच्या न्यूज आणि सोशल मिडिया, युट्यूबर यांच्यावर देखील बंधने आणली आहेत. केंद्र सरकारने पाकिस्तानच्या 16 यूट्यूबचॅनेल्सवर बंदी घातली आहे. भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानी यूट्यूब छणलेस भारतीय सेनेविरुद्ध खोटा प्रचार करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.