आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी परदेशात गेली, पण घडलं भलतंच; निमिषा 16 जुलैला होणार फाशी
केरळच्या पलक्कड जिल्ह्यातून नर्सिंग क्षेत्रात काम करण्यासाठी यमनमध्ये गेलेल्या निमिषा प्रियावर आता मृत्यूदंडाची टांगती तलवार आहे. 16 जुलै रोजी तिला येमन सरकारकडून फाशी दिली जाणार असल्याचे समोर आले आहे. तिच्यावर एका स्थानिक नागरिकाच्या हत्येचा गंभीर आरोप असून, सद्यस्थितीत ती तुरुंगात आहे.
मानवाधिकार कार्यकर्ते सॅम्युअल जेरोम यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. निमिषाच्या आईकडून त्यांच्याकडे अधिकृत ‘मुखत्यारपत्र’ (Power of Attorney) आहे. जेरोम यांच्या माहितीनुसार, यमनमधील तुरुंग प्रशासनाने फाशीची तारीख अधिकृतपणे कळवली असून याची माहिती निमिषालाही देण्यात आली आहे.
मिलान विमानतळावर थरकाप उडवणारी घटना! विमानाच्या इंजिनमध्ये अडकला तरुण अन् पुढे घडलं भयंकर
निमिषाला वाचवण्यासाठी येमनच्या कायद्यानुसार ‘ब्लड मनी’ म्हणजे रक्तरक्कम देण्याचा पर्याय समोर ठेवण्यात आला होता. एका प्रायोजकाच्या मदतीने पीडित कुटुंबाला 10 लाख डॉलर्स (सुमारे 8.3 कोटी रुपये) देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, संबंधित कुटुंबाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे हा पर्यायही अयशस्वी ठरला आहे.
दरम्यान, अजूनही काही कायदेशीर आणि मुत्सद्दी पर्याय खुले असल्याचे सांगितले जात आहे. भारत सरकारने हस्तक्षेप केल्यास ही फाशी थांबवता येऊ शकते, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
निमिषा प्रिया ही केरळमधील गरीब कुटुंबातून आलेली तरुणी. तिचे आई-वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर. त्यांना चांगले आयुष्य मिळावे म्हणून तिने नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2011 मध्ये यमनमध्ये काम करण्यासाठी गेली. तिने विविध रुग्णालयांमध्ये नर्स म्हणून सेवा दिली आणि पुढे स्वतःचे एक वैद्यकीय क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला.
2014 मध्ये तिची ओळख तलाल अब्दो महदी या यमनमधील नागरिकाशी झाली. त्याच्या मदतीने तिने 2015 मध्ये क्लिनिक सुरू केले. यमनच्या कायद्यानुसार विदेशी नागरिकांना स्थानिक व्यक्तीसोबत भागीदारी करूनच व्यवसाय करता येतो, म्हणून तिने महदीसोबत भागीदारी स्वीकारली.
क्लिनिक सुरू केल्यानंतर काही काळातच निमिषा आणि महदी यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. महदीने तिचा छळ केल्याचा आणि पासपोर्ट परत न दिल्याचा आरोप तिने केला. तिने पोलिसांत तक्रार दाखल केली, मात्र महदी काही दिवसांत सुटला.
Israel Yemen War : ‘…याची मोठी किंमत मोजावी लागेल’; इस्रायलच्या हल्ल्यांना हुथींचे प्रत्युत्तर
2017 मध्ये प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले. भारतात परतण्याची इच्छा असलेल्या निमिषाने एका स्थानिक तुरुंग रक्षकाचा सल्ला घेऊन महदीला शामक औषध देऊन त्याच्याकडून पासपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, औषधाचा डोस जास्त झाल्याने महदीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिला अटक झाली आणि न्यायालयाने तिला दोषी ठरवले.तिला फाशीपासून वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. परंतु वेळ अत्यंत कमी असून, भारत सरकारकडून तात्काळ हस्तक्षेप झाला तरच तिच्या प्राणांची रक्षा होऊ शकते.