नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाचा कडाका (Sun Heat) चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. त्यात आता एका ताज्या संशोधनात असे म्हटले आहे की, तापमानात (Increase in Temperature) 2.7 अंशांची वाढ 60 कोटींहून अधिक भारतीयांवर परिणाम करेल. जर ते 1.5 अंशापर्यंत मर्यादित असेल तर ते सहा पटीने कमी होऊ शकते. तर नऊ कोटी भारतीयांना वाढत्या उष्णतेचा आणि उष्माघाताचा (Sunstroke) रोष सहन करावा लागेल. तापमानात प्रत्येक 0.1 अंश वाढ झाल्यामुळे 14 कोटी उष्णतेच्या झळा सोसाव्या लागतील.
सध्या जगभरातील 60 दशलक्ष लोक अशा ठिकाणी राहत आहेत. जिथे सरासरी तापमान 29 अंशांपेक्षा जास्त आहे. युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटर, कमिशन आणि नानजिंग युनिव्हर्सिटीच्या ग्लोबल सिस्टम्स इनस्टिट्यूटचा हा अभ्यास नेचर सस्टेनेबिलिटीमध्ये प्रकाशित झाला आहे.
नायजेरियालाही फटका बसणार
भारतानंतर नायजेरियाला वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका बसणार आहे. तापमानात 2.7 अंशांची वाढ होताच देशातील 30 कोटी लोक उष्णतेच्या तडाख्यात सापडतील. तापमान 1.5 अंशांपर्यंत मर्यादित राहिल्यास हा धोका चार कोटी लोकांवर असेल. येत्या पाच वर्षांत पृथ्वीचे सरासरी तापमान 1.5 अंशांच्या मर्यादेपेक्षा 0.1 अंश वाढ झाल्यामुळे 14 कोटी लोकांवर परिणाम जास्त होईल, अशी भीती संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे. ही वाढ क्षणिक असेल प्रजाती संपुष्टात येतील, असा संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला.
केवळ मानवच नाही तर प्राण्यांनाही धोका
संयुक्त राष्ट्राच्या जागतिक हवामान संघटनेचा अंदाज आहे की, आता आणि 2027 दरम्यान, 19 व्या शतकाच्या मध्याच्या तुलनेत पृथ्वीचे तापमान वार्षिक 1.5 अंशांपेक्षा जास्त होईल.
2015 च्या पॅरिस करारामध्ये, हेच 1.5 डिग्री सेल्सियस सरासरी तापमान जगाच्या सुरक्षेसाठी धोकादायक मर्यादा मानले गेले होते आणि विविध देशांनी वचन दिले होते की ते ही मर्यादा ओलांडण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करतील.
याआधी एका संशोधनात असे म्हटले होते की, जर पृथ्वीचे तापमान 1.5 डिग्री सेल्सिअसने वाढले तर 15 टक्के प्रजाती नष्ट होतील. पृथ्वीचे तापमान 2.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त होताच. 30 टक्के
युनिव्हर्सिटी ऑफ केप टाऊन, युनिव्हर्सिटी ऑफ बफेलो आणि युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट यांनी एका संशोधनात हा दावा केला आहे.