ओडिसामधील पुरीमध्ये भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेला सुरुवात झाली आहे (फोटो - सोशल मीडिया)
ओडिसा : पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ भगवान यांची आजपासून रथयात्रा सुरू होत आहे. प्रचंड गर्दी आणि जगन्नाथांच्या जयघोषामध्ये भाविक भक्ती भावाने सहभागी झाले आहेत. पुरीमधील ही रथयात्रा फक्त ओडिसामध्ये नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. जगन्नाथ रथयात्रेत सहभागी होण्यासाठी करोडो भाविक उपस्थित राहत असतात. यासाठी प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. तसेच नियोजन व आयोजन केले आहे.
भगवान जगन्नाथांची ही रथयात्रा एकूण १२ दिवस चालेल आणि ८ जुलै २०२५ रोजी नीलाद्री विजयाने संपेल. या रथयात्रेदरम्यान अनेक धार्मिक विधी, पूजा आणि विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. या रथयात्रेचा प्रारंभ सकाळी ६ वाजता भगवान जगन्नाथाची मंगला आरती आणि सजावटीने झाला. दैनंदिन पूजा विधींनंतर, सकाळी ९:३० वाजता मंदिरातून भगवान बाहेर काढण्याच्या विधी सुरू झाले. यानंतर, रथांची पूजा करण्यात आली. तसेच बलभद्र, बहीण सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांना रथात बसवण्यात आले. यात्रेच्या वेळापत्रकानुसार, दुपारी ३ वाजता, पुरी राजघराण्याचे गजपती दिव्य सिंह देव सोन्याच्या झाडूने रथाचा पुढचा भाग झाडून रथयात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने भाविक याठिकाणी जमले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पौराणिक मान्यतेनुसार, भगवान जगन्नाथ वर्षातून एकदा त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र यांच्यासह त्यांच्या गुंडीचा मंदिरात जातात. गुंडीचे मंदिर हे भगवान जगन्नाथ आणि त्यांच्या भावडांच्या मावशीचे घरी आहे. त्यामुळे वर्षातून एकदा तिन्ही भावंडे ही भल्या मोठ्या तीन रथातून मावशीकडे आरामाला जात असतात. या रथयात्रेमध्ये सर्वात पुढे बलरामांचा रथ असतो. तर त्यांच्या मागे मध्यामध्ये बहीण सुभद्रा आणि शेवटी भगवान जगन्नाथ यांचा रथ असतो.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बलरामजींच्या रथाला तलाध्वज म्हणतात. त्याचा रंग लाल आणि हिरवा आहे. देवी सुभद्राच्या रथाला दर्पदलन किंवा पद्मरथ म्हणतात. त्याचा रंग काळा किंवा निळा आणि लाल असतो. तर भगवान जगन्नाथाच्या रथाला नंदीधाशा किंवा गरुडध्वज म्हणतात. त्याचा रंग लाल आणि पिवळा आहे. भगवान जगन्नाथाच्या नंदीघोष रथाची उंची 45.6 फूट, बलरामजींच्या तलध्वज रथाची उंची 45 फूट आणि देवी सुभद्राच्या दर्पदालन रथाची उंची 44.6 फूट असते. तिन्ही परमेश्वराचे हे रथ हे कडुलिंबाच्या पवित्र आणि परिपक्व लाकडापासून बनवले जातात, ज्याला दारु म्हणतात. हे रथ बांधण्यासाठी, एक निरोगी आणि शुभ कडुलिंबाचे झाड ओळखले जाते ज्यासाठी मंदिराकडून एक विशेष समिती स्थापन केली जाते. हे रथ तयार करण्यासाठी खिळ्याचा वापर केला जात नाही.
प्रशासनाकडून जोरदार तयारी
भगवान जगन्नाथ रथयात्रा हा मोठ्या दिव्य सोहळा असतो. यासाठी पुरीच्या प्रशासनाकडून एक एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर तयार करण्यात आले आहे, या ठिकाणाहून पूर्णपणे एआय आधारित सीसीटीव्ही पाळत ठेवणारी प्रणाली आहे. यामध्ये पुरी शहरातील सर्व रहदारी आणि पार्किंगशी संबंधित माहिती मिळते. सर्व विभागांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यात आली आहे आणि आम्ही एक वॉर रूम देखील स्थापन केला आहे. एसजेटीए अधिकाऱ्याने सांगितले की, दुपारी त्यांना रथ आखाड्यातून (रथ यार्ड) बाहेर काढले जाईल. रथ उभे करण्याचे विधी पार पाडले जातील. तलध्वज (भगवान बलभद्रचा रथ), देवी सुभद्राचे देवदालन आणि भगवान जगन्नाथाचा रथ नंदीघोष या तीन लाकडी रथ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मार्गस्थ झाले आहेत.