Photo Credit: Social Media
संसदेत राज्यसभेच्या कामकाजादरम्यान समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सभापती जगदीप धनखड यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. सभापती जगदीप धनखड यांच्या एका वक्तव्यावर आक्षेप घेत धनखड यांच्यावर निशाणा साधला. यामुळे धनखड हेदेखील चांगलेच भडकले. यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही दादगिरी चालणार नाही, अशी घोषणाबाजी करत सभागृहचा त्याग केला.
झालं असं की, जया बच्चन यांची राज्यसभेत बोलण्याची संधी आली तेव्हा सभापतींनी त्यांचे नाव पुकारले. यावर जया बच्चन म्हणाल्या, “मी एक कलाकार आहे, मला बॉडी लँग्वेज आणि एक्सप्रेशन समजतात. मला माफ करा सर, पण तुमचा टोन मला मान्य नाही. तुम्ही खुर्चीवर असलात तरी आम्ही तुमचे सहकारी आहोत. त्यावर सभापतीही चांगलेच भडकले आणि म्हणाले, “फक्त तुमची प्रतिष्ठा आहे, असे समजू नका. संसदेचे ज्येष्ठ सदस्य म्हणून तुम्हाला अध्यक्षांची प्रतिष्ठा कमी करण्याची परवानगी नाही.”
हेही वाचा: राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांचा बोलवता धनी सागर बंगला; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
जया बच्चन यांच्यावर संतापून अध्यक्ष म्हणाले की, तुम्ही महान गोष्टी साध्य केल्या आहेत, तुम्हाला माहित आहे की अभिनेता हा दिग्दर्शकही असतो. पण तुम्ही माझ्या स्वरावर शंका घेत आहात आणि मी हे आपण खपवून घेणार नाही. तुम्ही सेलिब्रिटी आहात. सभापतींच्या या भूमिकेवेर विरोधकही चांगलेच आक्रमक झाले. “जया बच्चन या संसदेच्या ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यांना तुम्ही सेलिब्रिटी कसे म्हणू शकता.
त्यावर राज्यसभा सदस्य सभापतींचा अवमान करत आहेत. माझ्याकडे माझी स्क्रिप्ट आहे, असेही सभापतींनी स्पष्ट केले. पण विरोधकांनी घोषणाबाजी करत सभागृहातून सभात्याग केला. तर आपल्यालाही या गोंधळात सहभाग घ्यायचा नाही असे सांगत तेही बाहेर निघून गेले. सभापतींनी भारत छोडो आंदोलनापासून आणीबाणीपर्यंतच्या सर्व गोष्टींचा उल्लेख करून अध्यक्षांनी विरोधकांवर प्रश्न उपस्थित केले.
9 ऑगस्ट 1942 च्या भारत छोडो आंदोलनाचा संदर्भ देत अध्यक्ष म्हणाले की, “आज ते संसदेतून निघून गेले. पण जग आपल्याला ओळखत आहे. जनता विकास पाहत आहे. आपण विकासाच्या प्रवासात आहोत. मी पूर्ण जबाबदारीने या व्यासपीठाचा वापर करतो. भारत हा शांतताप्रिय देश आहे. भारताच्या पंतप्रधानांची जागतिक ओळख आहे. सलग तिसऱ्यांदा सरकारची पुनरावृत्ती करून भारताने इतिहास रचला आहे. काही लोक शेजारील देशांचे उदाहरण देत आहेत.
अध्यक्ष म्हणाले की, हे एक नॅरेटिव्ह सेट करत असून आमच्या संस्थांना लक्ष्य करत आहे. त्यांनी डाव्या विचारसरणीच्या लोकांचाही उल्लेख करत आणीबाणीवरून काँग्रेसलाही धारेवर धरले. तसेच ही काही सामान्य बाब नसून यामागे एक संपूर्ण यंत्रणा आहे. हा लोकशाहीचा अपमान आहे, हे प्रत्येक नागरिकाना समजले पाहिजे, असेबी त्यांनी नमुद केले.