जम्मू-कश्मीर पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय
Jammu-Kashmir By-Elections Result 2025: जम्मू आणि काश्मीरमधील नागरोटा आणि बडगाम येथील विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलांवरून सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आणि मुख्य विरोधी भाजप यांच्यात चुरशीची लढत असल्याचे दिसून येते. नगरोटा आणि बडगाम या दोन्ही जागांसाठी ११ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील दोन्ही विधानसभेच्या जागांसाठी शुक्रवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार,भारतीय जनता पक्ष नागरोटा विधानसभा मतदारसंघात (एसी-७७) आघाडीवर आहे, तर नॅशनल कॉन्फरन्स बडगाम विधानसभा मतदारसंघात (एसी-२७) पुढे आहे.
नगरोटामध्ये मतमोजणीच्या ११ पैकी सहा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत आणि भाजपच्या देवयानी राणा २४,००० हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. तर नॅशनल कॉन्फरन्सच्या शमीम बेगम तिसऱ्या स्थानावर आहेत, सहाव्या फेरीपर्यंत ५,९०० मतांनी त्या आघाडीवर असल्याचे दिसत आहे. नॅशनल पँथर्स पार्टीचे हर्ष देव सिंह ८,२२० मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. नगरोटा विधानसभा जागेसाठी एकूण १० उमेदवार निवडणूक लढवत आहेत, ज्यात तीन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
बडगाममध्ये मतमोजणीच्या १७ पैकी पाच फेऱ्यांनंतर, पीडीपीचे आगा सय्यद मुंतझीर मेहदी १,५०० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर नॅशनल कॉन्फरन्सचे आगा सय्यद महमूद अल-मोसावी आहेत. दुसऱ्या फेरीपर्यंत मोसावी आघाडीवर होते, तर भाजप आणि जनता पक्ष चौथ्या क्रमांकावर आहेत.
मंगळवारी बडगाम आणि नगरोटा विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. बडगाममध्ये ४८ टक्के मतदान झाले, तर नागरोटा येथे ७२ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. बडगाम मतदारसंघात एकूण १.७६ दशलक्ष मतदार आहेत, तर नागरोटा मतदारसंघात एकूण ९७,८९३ मतदार आहेत.
Bihar Election Result 2025 : बिहार निवडणुकीत NDA 190 ने आघाडीवर; तर रितेश पांडे, तेजप्रताप, तेजस्वी
गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी भाजप आमदार देवेंद्र सिंह राणा यांच्या निधनामुळे नगरोटामध्ये पोटनिवडणूक घेणे आवश्यक होते. तर नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी बडगाममध्ये राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक घेणे आवश्यक झाले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल्ला यांनी बडगाम आणि गंदरबल दोन्ही जागा जिंकल्या. या परिस्थितीत, एक जागा सोडणे आवश्यक होते. त्या जागेवरही निवडणूक पार पडली.






