कर्नाटकातील ४८ नेत्यांचे काढले VIDEO, हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न; बड्या मंत्र्याच्या दाव्याने खळबळ
कर्नाटकमधील मंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवल्याची माहिती समोर येत असून देशभरात खळबळ माजली आहे. हनीट्रॅपमध्ये कोणते मंत्री असतील याची चर्चा सुरु असताना सहकार मंत्री केएन राजन्ना यांनी विधानसभेत याबाबत माहिती. स्वत:ही हनीट्रॅपमध्ये अडकल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देश आणि राज्यस्तरीय 48 नेत्यांच्या हनीट्रॅपच्या व्हिडिओ सीडी असल्याचा दावा त्यांनी केला असून त्यांच्या या दाव्यामुळे देशभरात खळबळ माजली आहे.
हनी ट्रॅपचा मुद्दा सर्वप्रथम विधानसभेत भाजपा आमदार सुनील कुमार करकला यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर गुरुवारी विधानसभेत यावर सखोल चर्चा झाली. भाजपा आमदार बसनगौडा पाटिल यतनाल यांनी विधानसभेत हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी थेट सांगितले की सहकारिता मंत्रीवर हनी ट्रॅपचा थेट आरोप करण्यात आले होता.
४८ राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचे हनी ट्रॅप व्हिडिओ त्याच्या नंतर मंत्री केएन राजन्ना यांनी स्वत: उभं राहून आमदार यतनाल यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना सांगितले की यतनाल यांनी माझं नाव घेतलं, तर मी तुम्हाला सत्य सांगतो. मी असं सांगत आहे की चुकीची माहिती सार्वजनिकपणे पसरवू नये. असं सांगितलं जातं की फक्त दोन मंत्री आहेत, मी आणि परमेश्वर.
काही लोक म्हणतात की कर्नाटकी सीडी फॅक्ट्री बनली आहे. ही गोष्ट फक्त इथेच सीमित नाही. राष्ट्रीय नेत्यांसाठीही हनी ट्रॅपचं जाळं रचण्यात आला आहे. मी लेखी तक्रार दाखल करणार आहे. त्यावरून तपास व्हायला हवा. साधारणतः ४८ राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या हनी ट्रॅप व्हिडिओ असल्याचा दावा त्यांनी केला.
राजन्ना म्हणाले की, हे फक्त आमच्या राज्यापुरते मर्यादित नाही. यामध्ये विविध राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. या सीडीत ४८ लोक आहेत. सार्वजनिक जीवनात असं काही होणं योग्य नाही. ते जे कोणी आहेत, त्यांना उघड करावं. लोकांना खरी माहिती कळायला हवी. मी गृहमंत्र्यांना याची तपासणी करण्याची विनंती करतो. यात कोण आहे? त्याचं निर्माते कोण आहे? तपासामुळे सर्वकाही उघड होईल. हे एक महामारी आहे आणि याला सार्वजनिकपणे उघड करायला हवं. मी या विरोधात तक्रार दाखल करणार आहे, असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गृहमंत्री म्हणाले – तक्रार केली तर तपास होईल. यामागे जे लोक आहेत, त्यांचा तपास केला जावा आणि त्यांना बेनकाब करावं. यावर गृहमंत्री परमेश्वर यांनी प्रतिक्रिया दिली आणि सांगितलं की राजन्ना लेखी तक्रार दाखल करतात. त्यांनी स्पष्ट केलं की लेखी तक्रार केली गेली तर उच्चस्तरीय तपासाची मागणी केली जाईल.
विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी, तपास काय होईल, याची घोषणा केली जावी. असे आरोप आहेत की अनेक लोक हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांनी न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली तपासाची करण्याची मागणी त्यांनी केली आहे.