बिकानेर फील्ड फायरिंग रेंजमध्ये बॉम्बचा स्फोट, 2 जवान शहीद
राजस्थानमधील बिकानेर येथील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये तोफांच्या सरावादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. सरावादरम्यान बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात २ जवान शहीद झाले आहेत. तर एक जवान गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाजन फील्ड फायरिंग रेंजच्या नॉर्थ कॅम्पमधील चार्ली सेंटरमध्ये हा अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवानाला सुरतगड येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
One Nation One Election : भारतात पहिल्यांदा एक देश एक निवडणूक कधी झाली? का बंद झाली? वाचा सविस्तर
मिळालेल्या माहितीनुसार, महाजन फील्ड फायरिंग रेंजच्या उत्तर कॅम्पमध्ये युद्ध सरावाव सुरू होता. या वेळी हा बॉम्बस्फोट झाला. आणि घटनास्थळी सराव करणाऱ्या दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहून लष्कर आणि पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई करत परिसर सील केला. महाजन फील्ड फायरिंग रेंजमधील ही दुसरी घटना आहे. ज्यामध्ये सुरक्षा प्रोटोकॉल आणि उपकरणांच्या चाचणीबाबत सर्वांची चिंता वाढली आहे. घटनेची माहिती मिळताच सीओ लुणकरनसर नरेंद्र पुनिया, लष्करी अधिकारी आणि पोलीस घटनास्थळाची पाहणी करत आहेत.
याआधीही अशाच एका घटनेत महाराज फील्ड फायरिंग रेंजमध्ये एका जवानाचा मृत्यू झाला होता. एकापाठोपाठ एक अशा घटना घडत असल्याने युद्धपातळीवर वापरण्यात येणाऱ्या उपकरणांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
Sanjay Singh : फक्त ३ तासांसाठी ED,CBI द्या, सर्वांना जेलमध्ये टाकतो! संजय सिंह राज्यसभेत कडाडले
विशेष म्हणजे बिकानेर येथील महाजन फील्ड फायरिंग रेंजवर युद्ध सरावादरम्यान घडलेला हा दुसरा अपघात आहे. तीन दिवसांपूर्वी येथे एका जवानाचा मृत्यू झाला होता. टोइंग वाहनाला तोफ जोडत असताना. तोफ घसरली आणि मध्येच त्याखाली दबून जवानाचा मृत्यू झाला होता.