Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : कोकणातल्या काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, मुंबईत घमासान

Marathi Breaking Live Updates : देश-विदेशसह राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थविश्वसह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: May 15, 2026 | 06:31 PM
Top Marathi News Today Live : पेट्रोल-डिझेलच्या दरात तीन रुपयांची वाढ

Top Marathi News Today Live : पेट्रोल-डिझेलच्या दरात तीन रुपयांची वाढ

Follow Us
Follow Us:

Marathi Breaking News Updates : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नीट यूजी २०२६ च्या पुनर्परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा २१ जून रोजी होणार आहे. एनटीएने ही माहिती ट्विट केली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारत सरकारच्या मान्यतेने, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नीट (यूजी) परीक्षा रविवार, २१ जून, २०२६ रोजी पुनर्निर्धारित केली आहे. उमेदवार आणि पालकांना केवळ एनटीएच्या अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवण्याची विनंती करण्यात येत आहे.

काल रात्री उशिरा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक झाली. ही बैठक जवळपास दोन तास चालली. यामध्ये पुनर्परीक्षा आणि भविष्यात पेपरफुटी रोखण्यावर चर्चा झाली. उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी, शालेय शिक्षण सचिव संजय कुमार, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे महासंचालक अभिषेक सिंग, CBSE चेअरपर्सन राहुल सिंग आणि केंद्रीय विद्यालय संघटन (KVS) व नवोदय विद्यालय समिती (NVS) च्या आयुक्तांसह इतर अधिकारीही उपस्थित होते. एजन्सीने आता पुनर्परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.

The liveblog has ended.
  • 15 May 2026 06:29 PM (IST)

    15 May 2026 06:29 PM (IST)

    “माझ्याबाबत अनेक चुकीच्या बातम्या पसरवल्या,” ED चौकशीनंतर रुपाली चाकणकरांचे मोठे वक्तव्य

    नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची १४ मे रोजी ईडीकडून कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. अशोक खरात सोबत केलेल्या गुवाहाटी दौऱ्याबद्दल तसेच त्याचासोबत कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “माझ्याबाबत अनेक चुकीच्या बातम्या पसरवल्या गेल्या. अनेक बातम्यांचा विपर्यास केला गेला. खरातसोबत आमचा कोणताही आर्थिक व्यवहार नव्हता. ईडीच्या चौकशीत मी सगळी उत्तर दिली आहेत,” असे त्या म्हणाल्या.

  • 15 May 2026 06:17 PM (IST)

    15 May 2026 06:17 PM (IST)

    SBI कर्मचाऱ्यांचा मोठा संप! देशभरातील बँकिंग सेवा दोन दिवस ठप्प होण्याची शक्यता; जाणून घ्या याचे कारण

    मुंबई: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ‘ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन’ने (AISBISF) मे महिन्याच्या अखेरीस दोन दिवसीय देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. बँक प्रशासनासोबत दीर्घकाळ चाललेली चर्चा निष्फळ ठरल्याने कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे देशभरातील बँकिंग सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • 15 May 2026 06:09 PM (IST)

    15 May 2026 06:09 PM (IST)

    Monsoon Rain Update: उकाड्यातून दिलासा! केरळात मान्सूनची एंट्री ठरली; IMD च्या अंदाजाने वाढली उत्सुकता

    Monsoon Rain Update in Marathi : देशभरात वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले असताना आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) केरळमध्ये मान्सून आगमनाची संभाव्य तारीख जाहीर केली असून यंदा मान्सून वेळेत किंवा किंचित लवकर दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे भीषण उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

  • 15 May 2026 05:50 PM (IST)

    15 May 2026 05:50 PM (IST)

    Monsoon Rain Update: उकाड्यातून दिलासा! केरळात मान्सूनची एंट्री ठरली

    Monsoon Rain Update in Marathi : देशभरात वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले असताना आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) केरळमध्ये मान्सून आगमनाची संभाव्य तारीख जाहीर केली असून यंदा मान्सून वेळेत किंवा किंचित लवकर दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे भीषण उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

  • 15 May 2026 05:35 PM (IST)

    15 May 2026 05:35 PM (IST)

    तोंडचा घास पळवला! ‘त्या’ 9 बॉलमध्ये Tilak Varma ने श्रेयसला केले दु:खी

    MI Vs PBKS IPL 2026 Updates: काल हिमाचल प्रदेशच्या धरमशाळा क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात महत्वाचा सामना पार पडला. कालचा सामना अत्यंत रोमांचक अशा स्थितीत झाल्याचे दिसून आले. पंजाब किंग्जने आपला सलग 5 वा सामना हातातून गमावला आहे. तर या लीगमध्ये मुंबईने आपला चौथा विजय नोंदवला आहे. तिलक वर्मा या सामन्याचा प्रमुख खेळाडू ठरला आहे.

  • 15 May 2026 05:20 PM (IST)

    15 May 2026 05:20 PM (IST)

    PM Modi UAE Visit : PM मोदींचा UAE दौरा संपन्न

    PM Modi UAE Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या सुरुवातील त्यांनी यूएईला भेट दिली. सध्या त्यांचा यूएईचा दौरा पूर्ण झाला असून आता ते नेदरलँडसाठी रवाना होती. आपण यूएई दौऱ्यात नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईच्या अबुधाबी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांना राजकीय सन्मासह विशेष गार्ड ऑफ ऑनर पुरस्कार प्रदान करण्यात आला. या दौऱ्यात पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही देशात उर्जा सुरक्षा आणि द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.

  • 15 May 2026 05:10 PM (IST)

    15 May 2026 05:10 PM (IST)

    व्यावसायिक हेतूने होणाऱ्या शाळांच्या स्थलांतराला ब्रेक

    पुणे : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या स्थलांतर धोरणात राज्य शासनाने महत्त्वपूर्ण सुधारणा करत नवीन नियमावली जाहीर केली आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून, यानुसार शाळांचे स्थलांतर केवळ अपवादात्मक परिस्थितीत किंवा भौतिक सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठीच मंजूर केले जाणार आहे. यामुळे विनाकारण किंवा व्यावसायिक कारणांमुळे होणाऱ्या स्थलांतरांवर निर्बंध येणार आहेत.

  • 15 May 2026 05:03 PM (IST)

    15 May 2026 05:03 PM (IST)

    Income Tax Return : ITR भरणं कठीण वाटतंय का?

    Income Tax Return तुमचाही भरायचा राहुन जातो का ? मग थांबा ही माहिती खास तुमच्यासाठी. जर तुम्हाला Tension आलं असेल तर थांबा या सोप्या पद्धतीने तुम्ही लगेचच इन्कम टॅक्स रिटर्न भरु शकता, कसं ते जाणून घेऊयात.

    ITR भरणं आता एकदम सोपं झालंय. फक्त सात सोप्या Steps मध्ये आता तुम्ही तुमचा ITR भरू शकता. अजूनही बऱ्याच जणांना Income Tax Return भरायचा म्हटला कि अगदी घाम फुटतो. मग तो कसा भरायचा, Form कुठून आणायचा, काय करायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतात आणि त्या नंतर काय होतं की, आपण बऱ्याचदा दीड ते दोन हजार रुपये घालून दुसऱ्यांकडे ITR Form भरून घेतो.

  • 15 May 2026 04:50 PM (IST)

    15 May 2026 04:50 PM (IST)

    भाईंदरमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठी शिकवणी कार्यशाळा; शासनाचा नवा उपक्रम

    महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिरा-भाईंदर शहरात प्रथमच हिंदी भाषिक रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा शिकवणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यातील संवाद अधिक सुलभ व्हावा तसेच मराठी भाषेचा वापर वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
    ही नाविन्यपूर्ण संकल्पना महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

  • 15 May 2026 04:45 PM (IST)

    15 May 2026 04:45 PM (IST)

    उत्तन डम्पिंग ग्राउंडला भीषण आग; धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

    भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरातील डम्पिंग ग्राउंडला गुरुवारी सकाळी भीषण आग लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले. आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिकांनी आरोग्याच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या उत्तन येथील धावगी भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प असून, प्रक्रियेअभावी लाखो क्युबिक मीटर कचरा साचून असल्याचे सांगितले जाते. गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या दरम्यान या कचऱ्याला अचानक आग लागली. सोसाट्याचा वारा असल्याने काही वेळातच आगीने मोठे रूप धारण केले आणि संपूर्ण परिसर धुराच्या विळख्यात गेला.

  • 15 May 2026 04:40 PM (IST)

    15 May 2026 04:40 PM (IST)

    इंधन दरवाढीविरोधात ठाकरे सेना आक्रमक

    इंधन दरवाढीविरोधात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कणकवली शहरात एसटी स्टँड ते पटवर्धन चौकपर्यंत मोर्चा काढण्यात आला. तसेच पेट्रोल-डिझेलचे दरवाढ करणाऱ्या भाजपा सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. “रद्द करा रद्द करा, पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा” अशा घोषणा देत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्ह्यात इंधन तुटवडा असून पंतप्रधान मोदी यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याच्या आवाहनावर टीका केली.

  • 15 May 2026 04:35 PM (IST)

    15 May 2026 04:35 PM (IST)

    नालासोपाऱ्यात मोठी दुर्घटना; पेल्हारमधील कंपनीत शॉक लागून 21 वर्षीय तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू!

    नालासोपाऱ्यातून एक अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे. नालासोपाऱ्याच्या पेल्हार परिसरात एका नामांकित कंपनीत काम करत असताना शॉक लागून एका 21 वर्षीय तरुण कामगाराचा मृत्यू झाला आहे. काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.नालासोपाऱ्याच्या पेल्हार परिसरातील 'नमन इंडस्ट्रीज' या कंपनीत काल रात्री 8 च्या सुमारास ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. देवकुमार गौतम असं मृत पावलेल्या 21 वर्षीय कामगाराचं नाव आहे.

  • 15 May 2026 04:25 PM (IST)

    15 May 2026 04:25 PM (IST)

    ढोकेश्वरमध्ये महामार्गावर कांदा ओतून 'रस्ता रोको'; अहिल्यानगर जिल्हा पेटणार?

    "कांद्याचे भाव घसरले, शेतकऱ्यांचे संसार मोडले!" अशा संतप्त घोषणा देत आज पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आक्रमक 'रस्ता रोको' आंदोलन करण्यात आले. भररस्त्यात कांदा ओतून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी इशारा दिला की, मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र संघर्ष छेडला जाईल. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात झालेली मोठी घसरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. याच अन्यायाविरोधात आज सकाळी 10.30 वाजल्यापासून टाकळी ढोकेश्वर येथील मुख्य चौकात शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

  • 15 May 2026 04:20 PM (IST)

    15 May 2026 04:20 PM (IST)

    माथेरानमधील आदिवासींचे स्टॉल सुशोभीकरणाच्या नावाखाली हटवण्याचा डाव

    माथेरान मधील डोंगरात राहणारे आदिवासी लोक आपल्या हातांनी वेगवेगळ्या वस्तू घडवून आणतात.या हस्तकला वस्तूंना माथेरान मध्ये येणाऱ्या पर्यटक यांच्याकडून प्रचंड मागणी आहे.मात्र कपाडिया मार्केट समोर किमान 100 वर्षे व्यवसाय करणारे हे आदिवासी सुशोभीकरणाच्या नावाखाली बेदखल होण्याची भीती निर्माण झाली आहे. कर्जत तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो मात्र याच तालुक्यामध्ये माथेरान हे जागतिक दर्जाचे थंड हवेचे ठिकाण वसलेले आहे.या थंड हवेचे ठिकाणे विविध देशातून तसेच विविध राज्यातून पर्यटक येथे फिरण्यासाठी येत असतात. मात्र याच पर्यटनाच्या ठिकाणी माथेरानच्या किंवा कर्जत तालुक्यामध्ये असणारे आदिवासी बांधव जंगलामध्ये जाऊन जंगलचा रानमेवा गोळा करून माथेरान मध्ये विकण्यासाठी आणतात.

  • 15 May 2026 04:15 PM (IST)

    15 May 2026 04:15 PM (IST)

    नेरळ येथील समाधान शिबिरात 591 लाभार्थ्यांच्या सहभाग

    नेरळ येथे महसूल विभागाच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' आयोजित केले होते.नागरिकांना एकाच छताखाली शासकीय कामकाज संबंधी सर्व दाखले मिळणार असल्याने लाभार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.या शिबिरात तब्बल ५९१ लाभार्थींकी सहभाग घेतला आणि दाखले मिळविण्यासाठी कागदपत्रांची कार्यवाही पूर्ण केली. तर अनेकांना विविध योजनांचा लाभ यांचे वितरण देखील झाले.

  • 15 May 2026 04:10 PM (IST)

    15 May 2026 04:10 PM (IST)

    कृष्णाईच्या लेकी मराठी मालिकेचा पहिला प्रोमो; निवेदिता सराफ यांचं झी मराठीवर दमदार कमबॅक

    कृष्णाईच्या लेकी मालिकेचा पहिला प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून निवेदिता सराफ यात मुख्य भुमिकेत असणार आहे. कृष्णाईच्या लेकी या मालिकेत एक संघर्ष करणारी स्त्री जिने आपल्या लेकींसाठी सगळ्याचा त्याग केला तिचा गोष्ट सांगण्यात आली. जवळपास चार ते पाच वर्षांनी पुन्हा एकदा ; निवेदिता सराफ यांचं झी मराठीवर दमदार कमबॅक झालं आहे.

  • 15 May 2026 04:05 PM (IST)

    15 May 2026 04:05 PM (IST)

    मनपा पदाधिकाऱ्यांसाठी २५ लाखांच्या आलिशान ‘ईव्ही’ गाड्यांची खरेदी

    शहरात भीषण पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले असताना महानगरपालिकेकडून पदाधिकाऱ्यांसाठी आलिशान ईलेक्ट्रक वाहन खरेदीची तयारी सुरू झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक भागांत १० ते १२ दिवसांआड पाणीपुरवठा होत असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. उन्हाचा पारा ४३ अंशांवर गेल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. अशा पार्श्वभूमीवर महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांच्यासाठी प्रत्येकी सुमारे २५ लाख रुपये किमतीच्या ईव्ही गाड्या खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वाचा सविस्तर

  • 15 May 2026 04:04 PM (IST)

    15 May 2026 04:04 PM (IST)

    खालापूर प्रशासकीय भवनाचे लोकांर्पण

    खालापूर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये एका छता खाली यावी व नागरिकांचा त्रास वाचावा म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांनी सुसज्य प्रशासकीय भावनाचे भूमिपूजन केले होते. व त्यासाठी 11 कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून घेतले होते.आज त्या प्रशासकीय भावनाचे आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी, जिल्हाधिकारी किसन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.या कार्यक्रमा दरम्यान दृतगती महामार्गावर अपघात झालेल्या प्रोपोलीन गॅस टँकर च्या वेळी 36 तास जीवाची पर्वा न करता मदतकार्य करणाऱ्या हेल्प फाउंडेशन च्या टीम चा सत्कार करण्यात आला.

  • 15 May 2026 04:00 PM (IST)

    15 May 2026 04:00 PM (IST)

    ब्रिक्स परिषदेत भारताचा दबदबा! Jaishankar यांच्या चार सूत्री अजेंडाची सर्वत्र चर्चा, वाचा सविस्तर

    भारताच्या राजधानी नवी दिललीत BRICS 2026 Summit चे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची ही बैठक होत असून आज या बैठकीचा दुसरा दिवस आहे. यावरुन भारताची जागतिक पातळीवर कूटनीतिक स्थान अधिक मजबूत होताना दिसत आहे. या परिषदेच्या भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर  अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. वाचा सविस्तर

  • 15 May 2026 03:55 PM (IST)

    15 May 2026 03:55 PM (IST)

    यूएईवरील हल्ल्यांचा पंतप्रधान मोदींकडून निषेध

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सहा देशांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यांचा यूएईचा दौरा पूर्ण झाला असून ते नेदरलँडसाठी जातील. यूएई दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारी वाढवण्यावर भर देण्यात आला. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी यूएईवरील हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. यूएईला ज्यापद्धतीने लक्ष्य करण्यात आले होते स्वीकारार्ह नाही असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी राष्ट्रीय एकता, सुरक्षा आणि प्रादेशिक अखंडता अबाधित राखण्यासाठी यूएईने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत केले. याशिवाय यूएईमधील भारतीया नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतल्याबद्दलही आभार व्यक्त केले.

     

  • 15 May 2026 03:50 PM (IST)

    15 May 2026 03:50 PM (IST)

    परमबीर सिंह यांच्या जामीनावर प्रश्नचिन्ह; एस्प्लनेड कोर्टाकडून CBI ला नोटीस

    मुंबईतील Esplanade Magistrate Court यांनी Central Bureau of Investigation आणि Param Bir Singh यांना नोटीस बजावत त्यांचा जामीन रद्द का करू नये, याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. Lilavati Kirtilal Mehta Medical Trust आणि Param Bir Singh यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर वादात ही महत्त्वाची घडामोड समजली जात आहे. वाचा संपूर्ण प्रकरण

  • 15 May 2026 03:45 PM (IST)

    15 May 2026 03:45 PM (IST)

    मोदींचा यूएई दौरा पूर्ण

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा UAE दौरा पूर्ण झाला आहे. यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल न्ह्यान यांनी पंतप्रधान मोदींना निरोप दिला आहे. सध्या पंतप्रधान मोदी सहा दिवसांच्या परेदश दौऱ्यावर असून पुढील भेटीत ते नेदरलँड्स भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदींनी यूएई दौरा अत्यंत उपयुक्त होता असे सोशल मीडियावर म्हटले. तसेच त्यांनी भारत आणि यूएईच्या सर्वसमावेश धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या विविध मार्गांवर चर्चा झाल्याचे सांगितले. दोन्ही देशांतील मैत्री, विकास आणि समृद्धीला बळ देण्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    Concluding a short but highly productive visit to the UAE. Held extensive discussions with my brother, His Highness Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan, on ways to further deepen the India-UAE Comprehensive Strategic Partnership. I am confident that the outcomes of this visit will… pic.twitter.com/pfRyLcOe7s

    — Narendra Modi (@narendramodi) May 15, 2026

  • 15 May 2026 03:40 PM (IST)

    15 May 2026 03:40 PM (IST)

    क्रूड ऑईलचे उत्पादन वाढवणार UAE

    संयुक्त अरब अमिरातील नुकेत जगातील जगातील प्रमुख तेल-निर्यातदारांच्या राष्ट्रांच्या संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता. सध्या यूएई २०२७ पर्यंत आपल्या कच्चा तेलाचे उत्पादन दररोज ५ दशलक्ष बॅरलपर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे. याच पार्श्वभूमीवर भारत आणि यूएई स्थित कंपन्यांध्ये दीर्घकालीन उर्जा करारांसाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. याचा उद्देश दोन्ही राष्ट्रांमध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारी वाढवणे आहे.

     

     

     

  • 15 May 2026 03:35 PM (IST)

    15 May 2026 03:35 PM (IST)

    भारत- यूएई संबंध अधिक मजबूत आहे

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यूएईचा दौरा नुकताच पूर्ण झाला आहे. या दौऱ्यात त्यांनी दोन्ही देशांच्या संबंधाचे वर्णन भक्कम आणि विश्वासार्ह असे केले आहे. त्यांनी म्हटले की, दोन्ही देशांची मैत्री अत्यं दृढ आहे. भविष्यात दोन्ही देश एकत्रितपणे कार्य सुरुच ठेवतील.

    The friendship between India and UAE is very strong! Our nations will keep working together with the aim of building a better future for our planet.@MohamedBinZayed pic.twitter.com/TzjU63GFll

    — Narendra Modi (@narendramodi) May 15, 2026

  • 15 May 2026 03:30 PM (IST)

    15 May 2026 03:30 PM (IST)

    गौतम अदानींवरील लाखचोरीचे फौजदारी गुन्हे अमेरिका करणार रद्द?

    एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतातील अदानी समूहाचे प्रमुख अदानी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अदानींविरोधातील लाखचोरी आणि फसवणुकीचा खटा अमेरिका अधिकृतपणे मागे घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेतील कॉर्पोरेट जगताता खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे न्याय विभाग लवकरच या संदर्भातील गुन्हे रद्द करण्याची घोषणा करु शकतो. वाचा सविस्तर

  • 15 May 2026 03:22 PM (IST)

    15 May 2026 03:22 PM (IST)

    शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची पुढची सुनावणी ३० जुलै रोजी होणार, ठाकरेंच्या नेत्यांना फटकारले

    शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सध्या सुप्रीम कोर्टात वाद सुरू आहे. त्याबाबतची सुनावणी आज झाली. मात्र, त्याबाबतची पुढची सुनावणी ही ३० जुलै रोजी होणार आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने ठाकरेंच्या नेत्यांना सुनावले आहे. तुमचे लोक माध्यमांमध्ये जाऊन जी विधाने करत आहेत, ती बेजबाबदार विधाने थांबवा, अशी तंबी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 15 May 2026 02:59 PM (IST)

    15 May 2026 02:59 PM (IST)

    मुंबई-अहमदाबाद महामार्गावर व्हॅन पलटी

    मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर चांदी वाहून नेणारी व्हॅन पलटी झाल्याची घटना घडली आहे. मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. या व्हॅनमध्ये तब्बल 600 किलो चांदीच्या विटा असून त्यांची किंमत अंदाजे 17 कोटी 66 लाख इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील नाकोडा बुलियन कंपनीकडून वापी जीआयडीसी इथल्या मोदी सन्स लिमिटेडकडे ही चांदी घेऊन जात असताना अपघात घडला. अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाला आहे.

  • 15 May 2026 02:47 PM (IST)

    15 May 2026 02:47 PM (IST)

    धनंजय लोखंडेपर्यंत विद्यार्थ्यांना पोहोचवायचं काम पुण्यातील मनीषा वाघमारे करायची, तपासात धक्कादायक माहिती समोर

    नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता मोठी गती मिळाली असून, बुधवारी पहाटे केलेल्या कारवाईत केंद्रीय अन्वेषण विभागाने पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 7 च्या मदतीने कात्रज परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव मनीषा संजय वाघमारे (46) असून, ती सुखसागर नगर भागात ब्युटी पार्लर चालवते. तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अहिल्यानगरमधून यापूर्वीच अटक करण्यात आलेला आरोपी धनंजय लोखंडे याला मनीषा वाघमारेने मदत केल्याचा संशय आहे. तथाकथित "गेस पेपर्स"च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुख्य आरोपींशी जोडून देण्यात तिची महत्त्वाची भूमिका असावी, असा अधिकाऱ्यांचा संशय आहे.

  • 15 May 2026 02:36 PM (IST)

    15 May 2026 02:36 PM (IST)

    धरणातील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाला परवानगी

    राज्यातील धरणांमधील गाळ वाढत असल्याने पाणीसाठ्याची क्षमता कमी होत आहे. त्यामुळे उजनी, गिरणा, गोसीखुर्द, मुळा, जायकवाडी आणि हतनूर या सहा मोठ्या प्रकल्पांच्या जलाशयातून प्रायोगिक तत्वावर गाळ व गाळमिश्रित वाळू काढण्यास राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली. हा गाळ शेतकऱ्यांना शेतात टाकण्यासाठी विनामूल्य दिला जाणार आहे. गाळ उपशासाठी कंत्राटदार नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना गाळ आणि वाळू दोन्ही काढणे बंधनकारक राहील. तसेच नैसर्गिक जमिनीच्या पातळीखाली दोन फुटांपेक्षा अधिक उत्खनन करण्यास मनाई करण्यात आली आहे. गाळ घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांनी फक्त वाहतूक खर्च करायचा असून कोणतेही स्वामित्व शुल्क आकारले जाणार नाही.

  • 15 May 2026 02:23 PM (IST)

    15 May 2026 02:23 PM (IST)

    हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला अटक

    हडपसर परिसरातील उषाकिरण रुग्णालयात टायमर बॉम्ब स्फोटक ठेवून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपूर रेल्वे जंक्शन येथून अटक केली. आरोपीची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणामागील हेतू, त्याचे साथीदार आणि इतर ठिकाणी अशाच प्रकारचा कट रचण्यात आला होता का, याचा तपास यंत्रणांकडून सुरू आहे.

  • 15 May 2026 02:19 PM (IST)

    15 May 2026 02:19 PM (IST)

    निवडणूक आयुक्त निवड प्रक्रियेवर न्यायलयाचा आक्षेप

    निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठीच्या निवड समितीमध्ये एका कॅबिनेट मंत्र्याचा समावेश करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. निर्णय प्रक्रियेत कोणताही मंत्री पंतप्रधानांच्या विरोधात जाऊ शकणार नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

  • 15 May 2026 02:07 PM (IST)

    15 May 2026 02:07 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा देणार - राजू शेट्टी

    हवामान बदलाचा कोकणातील बागायतदार, शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आंबा बागयतदारांना हेक्टरी पाच लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी तसेच काजू बागयदारांना हेक्टरी तीन लाख रुपयांची मदत द्यावी या मागणीसाठी आज (शुक्रवारी) गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचे निवास्थान वर्षा बंगल्यावर मोर्चा देणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सांगितले.

  • 15 May 2026 01:50 PM (IST)

    15 May 2026 01:50 PM (IST)

    सायलीच तन्वी असल्याचं सत्य होणार का उघड? ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रियाचं सत्य समोर आल्यानंतर सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबियांनी तिला घराबाहेर हाकलून दिलं. प्रियाने आजवर म्हणजेच गेले तीन वर्ष किल्लेदार कुटुंबियांना तन्वी असल्याचं सांगून फसवत राहिली. रविराज किल्लेदारची मुलगी असल्याचं खोट सांगत तिला किल्लेदारांची संपत्ती पाहिजे होती. त्यासाठी प्रियाने सगळ्या मर्यादा ओलांडल्या. स्वत:चं सत्य बाहेर पडू नये म्हणून अनेकांचा खून केला. हीच प्रिया तन्वी नाही हे अर्जुन आणि सायलीने किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबियांसमोर पुराव्यानिशी सिद्ध केलं.

  • 15 May 2026 01:35 PM (IST)

    15 May 2026 01:35 PM (IST)

    नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने लातुरातून निवृत्त प्राध्यपकाला घेतले ताब्यात

    गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लातूरमध्ये सीबीआय दाखल झाल्याच्या चर्चा रंगत होत्या. काही माध्यमांमध्येही नीट पेपरफुटी प्रकरणातील चौकशीची धागेदोरे पुणे आणि लातूरपर्यंत पोहोचल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अखेर गुरुवारी सीबीआयच्या पथकाने कारवाई करत एका सेवानिवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आल्याने चर्चांना अधिकच उधाण आले आहे.

  • 15 May 2026 01:25 PM (IST)

    15 May 2026 01:25 PM (IST)

    भारत भूमीवर पोहोचताच इराणच्या संतापाचा स्फोट; अराघची यांनी व्यक्त केला रोष

    नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘ब्रिक्स’ (BRICS) परराष्ट्र मंत्र्यांच्या दोन दिवसीय शिखर परिषदेने जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या बैठकीत सहभागी होण्यासाठी भारतात आलेल्या इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी, सय्यद अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर अत्यंत कठोर शब्दांत हल्ला चढवला आहे. “अमेरिका आता एका जखमी जनावरासारखी वागत असून, जगाने या दडपशाहीला चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे,” असे विधान करत त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी धोरणांवर आपला रोष व्यक्त केला आहे.

  • 15 May 2026 01:15 PM (IST)

    15 May 2026 01:15 PM (IST)

    बस डेपोत ST चालकाची अरेरावी; चौकशी करणाऱ्या प्रवाशाला लगावली कानशिलात

    सोशल मीडिया आता केवल मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही. यामुळे अनेक धक्कादायक घटनांचा खुलासा होऊ लागला आहे. सध्या सोशल मीडियावर संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका एसटी ड्राव्हरने चौकशी करायला आलेला प्रवाशाला मारहाण केली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र, चालकाला ही गुंडागिरी चांगलीच महागात पडली आहे. प्रशासनाने व्हिडिओ व्हायरल होताच तातडीने चालकाला निलंबित केले आहे.

  • 15 May 2026 01:05 PM (IST)

    15 May 2026 01:05 PM (IST)

    अंपायरला शिवीगाळ केल्याने टिंग कोच Kieron Pollard ला भरभक्कम दंड

    मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला आहे. या हंगामातील ५८ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पंजाब किंग्सशी झाला. सामन्यादरम्यानच्या त्यांच्या वर्तनाबद्दल पोलार्डला दंड ठोठावण्यात आला आहे.

    किरॉन पोलार्ड यांना त्यांच्या सामना शुल्काच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे आणि एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक कायरोन पोलार्ड यांना खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांसाठी असलेल्या आयपीएल आचारसंहितेच्या स्तर १ चे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्या लागू सामना शुल्काच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे आणि त्यांच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट जोडण्यात आला आहे.”

  • 15 May 2026 01:02 PM (IST)

    15 May 2026 01:02 PM (IST)

    82 वर्षीय सासूचा 60 वर्षीय सुनेने केला खून

    कौटुंबिक वाद विवादातून सुनेनेच ८० वर्षीय सासूवर स्वयंपाकघरातील सुरीने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भारती विद्यापीठ परिसरात ही घटना घडली असून, पोलिसांनी सुनेला अटक केली आहे. सुमन अण्णासाहेब शिंदे (वय ८२, रा. समृद्धी रेसीडन्सी, आंबेगाव बुद्रुक, भारती विद्यापीठ परिसर) असे खून झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सून अनुपमा संजय शिंदे (वय ६०) हिला अटक केली आहे. याबाबत पोलिस शिपाई मल्लिकार्जुन कोळी यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दिली आहे.

  • 15 May 2026 12:48 PM (IST)

    15 May 2026 12:48 PM (IST)

    दौंडच्या पहिल्या महिला आमदार यांचं निधन

    दौंड तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार तसेच ज्येष्ठ सहकार नेत्या उषादेवी कृष्णराव जगदाळे पाटील (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे दौंड तालुक्यात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन विवाहित कन्या, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

  • 15 May 2026 12:36 PM (IST)

    15 May 2026 12:36 PM (IST)

    ‘व्हीआयपीं’च्या पुणे दौऱ्याचा ताफा आता निम्म्यावर!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहानानंतर पुणे पोलिसांनी देखील इंधन व खर्चावर नियंत्रण आणण्यास सुरूवात केली असून, पुण्यातील व्हीआयपी दौऱ्यांदरम्यान रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचे ताफे आता निम्मे करण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला आहे. इंधन बचत, सरकारी खर्चावर नियंत्रण आणि साधेपणाला प्राधान्य देण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. पुणे पोलिसांकडून व्हीआयपींच्या कॉन्व्हॉयमधील वाहनांची संख्या सुमारे ५० टक्क्यांनी कमी केली जाणार आहे. त्यामुळे यापुढे शहरातील व्हीआयपी दौरे कमी वाहनांत पार पडणार आहेत. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, पूर्वी एखाद्या व्हीआयपी दौऱ्यासाठी सुरक्षा आणि प्रोटोकॉलनुसार साधारण १२ ते १३ वाहनांचा ताफा ठेवला जात होता. मात्र, आता ही संख्या कमी करून केवळ ५ ते ६ वाहनांपर्यंत मर्यादित केली जाईल. विशेषत: अनेक व्हीआयपी व्यक्ती स्वतःहून फोन करून आपल्या दौऱ्यात कमीत कमी वाहनांचा वापर करण्याची विनंती करत असल्याचेही आयुक्तांनी नमूद केले.

  • 15 May 2026 12:24 PM (IST)

    15 May 2026 12:24 PM (IST)

    आरपीआयच्या पदाधिकाऱ्याची चाकूने भोसकून हत्या

    आरपीआय पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य आरपीआय कामगार आघाडीच्या अध्यक्षाची दोन अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना बुधवारी (१३ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास मोशी टोलनाका परिसरातील युवराज गार्डन हॉटेलमध्ये घडली आहे. जुन्या वादातून ही हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, मुख्य सूत्रधार म्हणून नितीन धोत्रे याचे नाव समोर आले आहे. अनिल मारुती गोळे उर्फ मोरे (वय ४६, रा. कुरुळी, खेड) असे खून झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मोरे यांच्या वाहनावरील चालक नागनाथ कुंडलिक चाटे (वय ४३, रा. कुरळी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.

  • 15 May 2026 12:12 PM (IST)

    15 May 2026 12:12 PM (IST)

    पुरंदर विमानतळासाठीच्या भूसंपादनासाठी 920 एकर जमिनीसाठी संमतीचे करार

    पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी आत्तापर्यंत ७ गावांतील शेतकऱ्यांकडून ९२० एकर जमिनीसाठी संमतीचे करारनामे झाले आहेत. एकूण हव्या असलेल्या ३ हजार ४० एकर जमिनीच्या तुलनेत हे प्रमाण ३०.२६ टक्के इतके आहे. दरम्यान, जमिनीच्या मोबदल्यापोटी गेल्या तीन दिवसांमध्ये मुळ शेतकऱ्यांना एकूण ११५ कोटी रुपयांच्या रकमेचे वाटप केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

  • 15 May 2026 11:53 AM (IST)

    15 May 2026 11:53 AM (IST)

    21 जूनला परीक्षा; अ‍ॅडमिट कार्ड जारी होण्याची शक्यता कधी?

    भारत सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) नीट यूजी २०२६ परीक्षेच्या पुनर्परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. नीट यूजी २०२६ परीक्षा रविवार, २१ जून २०२६ रोजी होणार आहे. एका अधिकृत निवेदनात, एनटीएने उमेदवार आणि पालकांना परीक्षेसंबंधित अद्यतने आणि इतर माहितीसाठी केवळ अधिकृत वेबसाइटवर अवलंबून राहण्यास सांगितले आहे. संस्थेने त्यांना एनटीएच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त इतर कोणत्याही पोर्टल किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अवलंबून न राहण्याचा सल्ला दिला आहे.

  • 15 May 2026 11:43 AM (IST)

    15 May 2026 11:43 AM (IST)

    पुतिन यांची मोठी गर्जना! जगातील सर्वात शक्तीशाली Sarmat Missile तैनातीचे आदेश

    आता मी मृत्यू बनलो आहे, जगाचा विनाशक… अणूबॉम्बचे जनक ओपनहायमर यांचे हे वाक्य पुन्हा एकदा जगाला आठवले आहे.  कारण नुकतेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी एक मोठी घोषणा केलीा आहे. यामुळे केवळ पाश्चात्य देशच नव्हे, तर संपूर्ण जगाची झोप उडाली आहे.  रशियानेजगातील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या Saramt या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिलाईसल्ची यशस्वी चाचणी पुर्ण केली असून या वर्षाच्या अखेरीस तैनात कले जाऊ शकते.

  • 15 May 2026 11:33 AM (IST)

    15 May 2026 11:33 AM (IST)

    लज्जास्पद! अमेरिकन सिनेटरकडून भारतीयांचा अपमान

    जागतिक स्तरावर भारतीय बुद्धिमत्तेचा डंका वाजत असतानाच, आता अमेरिकेतून (America) एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे रिपब्लिकन सिनेटर एरिक श्मिट यांनी एच-१बी (H1B) व्हिसा कार्यक्रमावर आणि विशेषतः भारतीय कामगारांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. श्मिट यांनी केवळ धोरणात्मक टीका न करता, थेट भारतीयांच्या धार्मिक श्रद्धेशी जोडल्या गेलेल्या हैदराबादमधील प्रसिद्ध चिलकुर बालाजी मंदिराचा फोटो शेअर करून त्याची खिल्ली उडवली आहे. या प्रकरणामुळे अमेरिकेत काम करणाऱ्या लाखो भारतीयांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 15 May 2026 11:23 AM (IST)

    15 May 2026 11:23 AM (IST)

    6,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच! फीचर्सनी वेधलं यूजर्सचं लक्ष

    टेक कंपनी Vivo ने आणखी एक दमदार 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन Vivo Y60 या नावाने लाँच केला आहे. अलीकडेच कंपनीने Vivo Y600 Pro स्मार्टफोन लाँच केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका नव्या मॉडेलसह विवो इतर टेक कंपन्यांची झोप उडवण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने त्यांचे नवीन हँडसेट तीन रंग आणि तीन व्हेरिअंटमध्ये लाँच केले आहे. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत केवळ 25 हजार रुपये आहे. विवोने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनची किंमत आणि इतर फीचर्स जाणून घेऊया.

  • 15 May 2026 11:13 AM (IST)

    15 May 2026 11:13 AM (IST)

    पंतप्रधान मोदींचे 5 दिवस, 5 देश अन् भारताचा ‘ऊर्जा’ विजय; UAEमध्ये होणार LPG साठी

    जागतिक राजकारणात सध्या इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे युद्धाचे ढग दाटले आहेत. अशातच, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आजपासून पाच देशांच्या अतिशय महत्त्वाच्या दौऱ्याला सुरुवात करत आहेत. या दौऱ्याची सुरुवात संयुक्त अरब अमिरातीपासून (UAE) होणार असून, हा दौरा केवळ औपचारिक नसून भारताच्या ‘ऊर्जा सुरक्षे’साठी एक मैलाचा दगड ठरणार आहे. पुढच्या सहा दिवसांत पंतप्रधान मोदी युएईसह नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत.

  • 15 May 2026 11:03 AM (IST)

    15 May 2026 11:03 AM (IST)

    पेट्रोल डिझेल कडाडले! कोणत्या शहरात स्वस्त आणि कुठे बसणार खिशाला फटका घ्या जाणून

    पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज अखेर वाढ झाली. तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपये किंवा त्याहून अधिक वाढ केली आहे. पश्चिम आशियाई संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमती अंदाजे ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे तेल कंपन्यांच्या नफ्यावर दबाव येत असून, त्यांना दरमहा ३०,००० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शहरांनुसार बदलतात. कोणते शहर सर्वात महाग आणि कोणते सर्वात स्वस्त आहे?

  • 15 May 2026 10:45 AM (IST)

    15 May 2026 10:45 AM (IST)

    21 जून रोजी होणार NEET UG Re Exam, तारखेची झाली घोषणा

    नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नीट यूजी २०२६ च्या पुनर्परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा २१ जून रोजी होणार आहे. एनटीएने ही माहिती ट्विट केली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारत सरकारच्या मान्यतेने, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नीट (यूजी) परीक्षा रविवार, २१ जून, २०२६ रोजी पुनर्निर्धारित केली आहे. उमेदवार आणि पालकांना केवळ एनटीएच्या अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवण्याची विनंती करण्यात येत आहे.

  • 15 May 2026 10:35 AM (IST)

    15 May 2026 10:35 AM (IST)

    गेम खेळण्यावरून झाला वाद; मामाने भाच्याला संपवलं

    कल्याणमधील उंबर्डे येथील कोळीवली परिसरातील रॉयल ढाब्यावर मोबाईल गेमवरून झालेल्या किरकोळ वादाने रक्तरंजित वळण घेतले. १७ वर्षीय मामाने चाकूने गळा चिरून आपल्याच १९ वर्षीय भाच्याची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Marathi breaking live updates marathi top news international news national news crime news live updates 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • international news
  • live updates
  • Marathi Breaking
  • Navarashtra Live Update

संबंधित बातम्या

Study in Germany : परदेशात शिक्षणाचे स्वप्न? कमी खर्चात जर्मनीतील ‘ही’ 5  विद्यापीठांमध्ये मिळू शकते मोठी संधी
1

Study in Germany : परदेशात शिक्षणाचे स्वप्न? कमी खर्चात जर्मनीतील ‘ही’ 5 विद्यापीठांमध्ये मिळू शकते मोठी संधी

Maharashtra Breaking News Updates Today:  पुण्यासह आज ‘या’ ५ जिल्ह्यांना यलो अलर्ट
2

Maharashtra Breaking News Updates Today: पुण्यासह आज ‘या’ ५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.