भावनगरमधील पॅथॉलॉजी लॅबला भीषण आग (फोटो- ट्विटर)
गुजरातच्या भावनगरमधील पॅथॉलॉजी लॅबला भीषण आग
हळू हळू आग संपुन कॉम्प्लेक्समध्ये पसरली
बिल्डिंगमधील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले
गुजरातमधील भावनगर येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. गुजरातमधील भावनगर येथील काला नाला भागातील एका पॅथॉलॉजी लॅबला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. लॅबमध्ये लागलेली आग हळूहळू सर्व बिल्डिंगमध्ये पसरली. तसेच जवळील काही रूग्णालयांना देखील या आगीने प्रभावित केले. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि ५० पेक्षा जास्त अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अग्निशमन दलाच्या जवानांनी बिल्डिंगमधील १९ रूग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ज्या कॉम्पलेक्समधील पॅथॉलॉजी लॅबला ही आग लागली त्या कॉम्प्लेक्समध्ये हॉस्पिटल्स आणि दुकाने व अनेक ऑफिसेस आहेत. अग्निशमन दलाने बचावकार्य अत्यंत वेगाने केले. कॉम्प्लेक्सच्या काचा फोडून रुग्णालयात भरती असणाऱ्या मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
सर्व रुग्णांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग लागताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरु केले. नंतर अग्निशमन दलाचे सर्वाना सुरक्षितपणे बाहेर काढले. १९ ते २० लोकांना सुखरुपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि ५० पेक्षा जास्त जवान या बचावकार्यामध्ये सामील झाले होते.






