कोणतही मेसेजिंग ॲप वापरताना जेव्हा काही बोलण्यासाठी आपल्याला शब्दांचा वापर नाही करायला असेल तर आपण इमोजीच वापर करतो. या इमोजी अनेक प्रकारात असतात. हास्य, अश्रू, राग अशा विविध भावना व्यक्त करण्यासाठी विविध इमोजीचा आपण वापर करतो. लोक तंत्रज्ञानाचा इतका वापर करू लागले आहेत की, त्यांनी आपल्या भावना आणि शब्द व्यक्त करण्यासाठी इमोजी वापरण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर हार्ट इमोजीचाही वापर करतात. गुलाबी, लाल, हिरवा, पिवळा, जांभळा, निळा अशा विविध प्रकारच्या इमोजी आपण वापरतो. पण या सगळ्या हार्ट इमोजींचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? आज जागतिक इमोजी दिनाच्या निमित्ताने जाणून घ्या वेगवेगळ्या कलरच्या इमोजींचा अर्थ.
[read_also content=”आज जागतिक इमोजी दिवस! तु्मच्या मेसेजिंग ॲपमध्ये कशी पोहोचली इमोजी, जाणून घ्या या दिवसाचा इतिहास https://www.navarashtra.com/india/history-and-significance-of-world-emoji-day-nrps-432723.html”]
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचे इमोजी आहेत, परंतु त्यापैकी सर्वात जास्त वापरला जाणारा टीअर ऑफ जॉय इमोजी आहे, (tear of joy) जो हसून अश्रू बाहेर येताना दाखवतो. लोक त्याचा हसण्यासाठी आणि चेष्टा करण्यासाठी खूप वापर करतात.
लाल हृदय – प्रेम किंवा प्रणय दर्शवते.
ऑरेंज हार्ट – दोन मित्रांमधील प्रेमाशी संबंधित.
पिवळे हृदय – मैत्रीशी संबंधित, खरं प्रेम.
ग्रीन हार्ट – निरोगी आणि निसर्गाशी संबंधित.
ब्लू हार्ट – विश्वास आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे .
जांभळा हृदय – निषिद्ध प्रेम, विशेषत: ते प्रेमींसाठी आहे.
ब्लॅक हार्ट – हे दुःख आणि वेदना दर्शवते.
व्हाइट हार्ट – प्रेम आणि आपुलकी व्यतिरिक्त, हे शोक व्यक्त करण्यासाठी देखील वापरले जाते.
ब्राउन हार्ट – वांशिक ओळख संबंधित समस्यांच्या चर्चेसाठी.






