देशातील अनेक राज्यांना वकाली पावसाचा इशारा (फोटो -istockphoto)
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये वातावरणात बदल पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. दरम्यान आजचे वातावरण कसे असेल याबाब्तसविस्तर जाणून घेऊयात. हवामान विभागाने आज देशातील हरियाणा, उत्तर प्रदेश आणि काही राज्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. दिल्ली, एनसीआर, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तराखंड राज्यात अवकाळी पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार वादळी वारे व पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर राजधानी दिल्लीमहदये तापमानात घट झाली आहे.
राजधानी दिल्लीला आज हलका पाऊस आणि पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल मध्यप्रदेशमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. दरम्यान आज देखील मध्यप्रदेशच्या अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वारे देखील होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशमध्ये देखील जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. आज देखील उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तसेच अवकाळी पाऊस देखील होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन सरकार व प्रशासनाने केले आहे. राजस्थानमध्ये देखील काळ रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. आज देखील अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ष्ट्रात कसे असणार हवामान?
सोमवारी महाराष्ट्रातील अनेक भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे. उद्या आणि परवा, महाराष्ट्र, गुजरात आणि पूर्वेकडील भागात अवकाळी पशु होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील देखील काही राज्यांना हवामान विभागाने वादळी वार्यासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.