अंदमान निकोबारमध्ये सावरकरांचे स्मारक होणार (फोटो -ट्विटर)
मुंबई: राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी आज अंदमान येथील सेल्युलर जेल येथे भेट दिली. मंत्री आशीष शेलार यांनी अंदमान निकोबारचे मुख्य सचिव डॉक्टर चंद्र भूषण कुमार यांची देखील भेट घेतली. अंदमान येथे सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भव्य स्मारक व्हावे असा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे. त्या दृष्टीने मंत्री आशीष शेलार हे अंदमान निकोबर दौऱ्यावर आहेत.
मंत्री आशीष शेलार हे आज अंदमान निकोबार दौऱ्यावर आहेत. मंत्री आशीष शेलार यांनी आज सेल्युलर जेल येथे जाऊन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीचे दर्शन घेतले. ज्या कोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठेवण्यात आलेले, त्या खोलीत जाऊन आशीष शेलार नतमस्तक झाले.
आशीष शेलार यांनी अंदमान निकोबारचे मुख्य सचिव डॉक्टर चंद्र भूषण कुमार यांची भेट घेतली. यावेळी शेलार यांनी महाराष्ट्र शासनाची भूमिका मांडली. स्वतंत्र्यवीर सावरकर यांनी भारत माटेसाठि अंदमानच्या तुरुंगात कारावास भोगला. सेल्युलर जेल आणि अंदमान निकोबऱ्या परीससराशी सावरकर प्रेमींच्या असंख्य आठवणी आणि भावना जोडलेल्या आहेत.
सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीरांचे स्मारक व्हावे यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आशीष शेलार यांनी मांडला होता. त्यामुळे अंदमान निकोबार प्रशासनाला याबबात भूमिका स्पष्ट व्हावी यासाठी आशीष शेलार यांनी अंदमान निकोबारच्या मुख्य सचिवांची भेट घेतली.
आशीष शेलार यांची पोस्ट काय?
जुलमी इंग्रज राजवटीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अंदमान निकोबार येथील ज्या सेल्युलर जेलमध्ये डांबून ठेवले होते त्या अंधकारमय कोठडीत जाऊन सावरकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झालो. ज्या भिंतीवर सावरकरांनी अजरामर कविता लिहिल्या त्या भिंतींना स्पर्श करताना अंगावर रोमांच उभे राहिले.
जुलमी इंग्रज राजवटीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अंदमान निकोबार येथील ज्या सेल्युलर जेलमध्ये डांबून ठेवले होते त्या अंधकारमय कोठडीत जाऊन सावरकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झालो.
ज्या भिंतीवर सावरकरांनी अजरामर कविता लिहिल्या त्या… pic.twitter.com/UVkc66ZAjW
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 16, 2025
तो जेल, सावरकरांनी ओढलेला कोलू, आणि त्या वस्तू पाहताना भारतमातेच्या या महान सुपुत्राने भोगलेल्या जीवघेण्या यातनेचा अंदाज तर येतोच.. पण त्याचवेळी “अनादी मी अनंत मी” अवध्य मी भला… या ओळींचा अर्थ सुध्दा उलगडू लागतो त्रिवार अभिवादन !!
V. D. Savarkar : “स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या…; स्मृतीदिनानिमित्त ठाकरे गटाची मागणी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी
ठाकरे गटाकडून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्राने दोन हिंदुत्ववादी नेत्यांना भारतरत्न द्यायला हवा. असा ठराव महाराष्ट्राने केंद्राला पाठवायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सोईप्रमाणे प्रेरणस्थान मानतात. सरकार भाजपचं आहे, व्होट गणितासाठी भाजपने अनेक स्थानिक व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराची खिरापती वाटली. पंतप्रधान नेरंद्र मोदी-अमित शाह हे स्वयंभू आहेत. हा विषय त्यांच्या सरकारच्या अख्त्यारितील आहे. आमचीही मागणी आहे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळायला हवा, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.