तेलंगणात प्रचारादरम्यानच अपघात; रेलिंग तुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलरवरून मंत्रिमहोदय पडले खाली, व्हिडिओ होतोय व्हायरल…

तेलंगणाच्या आरमरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अपघात झाला आहे. सत्ताधारी पक्ष बीआरएसचे मंत्री केटीआर (Minister KTR) हे रेलिंग तुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलरवरून खाली पडले. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

    हैदराबाद : तेलंगणाच्या आरमरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अपघात झाला आहे. सत्ताधारी पक्ष बीआरएसचे मंत्री केटीआर (Minister KTR) हे रेलिंग तुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलरवरून खाली पडले. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

    प्रचारासाठी टेम्पो ट्रॅव्हलरच्या टपावर रेलिंग बांधण्यात आले होते. प्रचाराच्या रॅलीत अचानक चालकाने टेम्पो ट्रॅव्हलरचा वेग वाढविला आणि ब्रेक दाबला. यामध्ये रेलिंग तुटून मंत्री केटीआर, खासदार सुरेश रेड्डी आणि आमदार जीवन रेड्डी खाली कोसळले. या अपघातात मोठी दुखापत झालेली नसली तरी हे नेते किरकोळ जखमी झाले आहेत. प्रचारात दोन मंत्र्यांसह एका खासदाराचा समावेश होता. तेलंगणा विधानसभेची निवडणूक 30 नोव्हेंबर रोजी असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.

    चालकाने ब्रेक लावला अन्…

    प्रचारासाठी कार्यकर्त्यासह बसमधून प्रवास सुरू होता. यावेळी मंत्री केटीआर, जीवन रेड्डी आणि खासदार सुरेश रेड्डी प्रचाराच्या वाहनातून थेट खाली पडले. केटीआर, पुढे पडताना त्यांचे पोट सेफ्टी रॉडवर दाबले गेले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालकाने अचानक ब्रेक लावल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.