(फोटो सौजन्य: Instagram)
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात सुरुवातीला सर्व काही सामान्य दिसते पण काही सेकंदातच आपल्याला दृष्य बदलल्याचे दिसते. पारंपारिक पोशाख, केसांमध्ये गजरा आणि चेहऱ्यावरील हावभाव व्हिडिओकडे खास लक्ष वेधून घेतात. यात तरुणींचा एक ग्रुप चालू एस्कलेटरवर दोन ओळीत उभ्या असल्याचे दिसते. त्यांची नजर समोर असते आणि कमरेवर हात ठेवून त्या सुरुवातील उभ्या असतात. यानंतर काही सेकंदातच त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात, कमरेवरील हात बाजूला होतो आणि पाय त्या चालू पायऱ्यांवरच थिरकू लागतात. मुख्य म्हणजे असं करताना त्यातील एकाचाही तोल ढासळत नाही, त्या फार सुंदररित्या चालू एस्कलेटरवर आपले नृत्य सादर करतात. सोशल मिडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत असून यूजर्सने त्यांच्या कलेचे भरभरुन काैतुक केले आहे.
View this post on Instagram
तरुणींच्या नृत्याचा हा व्हिडिओ @teamanartana नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘प्रत्येक सकाळ अलार्मनेच सुरू होत नाही; आमची सकाळ तर ताल आणि मजेने सुरू होते’. अनेक यूजर्स हे दृष्य पाहून संतापले आणि त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यात एका यूजरने म्हटले की, “साध्या आणि सुंदर मुली”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आठ वेळा पाहणेही पुरेसे नाही – प्रत्येक वेळी त्या आठ तरुणींचे सौंदर्य, डौलदारपणा, अभिजातता आणि प्रसन्नता इतकी मोहक असते की ते सतत पाहत राहावेसे वाटते”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्यांनी किती सहजतेने ते करुन दाखवलं, खरंच कम्माल!”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






