नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) आजपासून सुरू होत असून ते १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा (Amrut Mahotsav Of Freedom) कालखंड आहे. येणाऱ्या २५ वर्षांनी देश शताब्दी (Century) साजरी करेल. या काळात आपल्याला नव्या उंची गाठायची आहे. यासाठी आपल्याला संकल्प करायचे आहेत.
#WATCH Prime Minister Narendra Modi at the
Parliament as the Monsoon session commences today pic.twitter.com/sRkvFdiZWr— ANI (@ANI) July 18, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सभागृहाचे सर्व सदस्य देशात नवी उर्जा भरण्यासाठी मदत करतील. हे अधिवेशन यासाठी महत्वाचे आहे. या अधिवेशनात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक (Presidential Election) होत आहे, असेही त्यांनी सांगितले. आम्ही नेहमी सभागृहाला संवादाचे सक्षम माध्यम मानतो, तीर्थक्षेत्र मानतो, जिथे खुल्या मनाने संवाद होतात. गरज पडल्यास वादविवाद व्हायला पाहिजे. विश्लेषण झाले पाहिजे. कारण धोरणे आणि निर्णयात सकारात्मकता येते. माझे सर्व सदस्यांना आवाहन आहे की गहन चर्चा व्हाव्यात. राष्ट्रहितासाठी आपण सभागृहाचा वापर करावा, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. देशाचा विकास जलद गतीने होत आहे. सदनाचा सर्वाधिक सकारात्मक वापर होऊन देशासाठी उपयोगी काम होईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.