जम्मू काश्मीरमध्ये एनआयएची छापेमारी (फोटो- सोशल मिडिया)
श्रीनगर: पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य दलाची कारवाई वाढली आहे. दरम्यान या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने जम्मू काश्मीरमधून दहशतवाद संपूर्णपणे नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच निमित्ताने एनआयएने आज अनेक भागात छापेमारी केली आहे. पुलगम, शोपिया, कुलगामसह अन्य ठिकाणी छापेमारी केली आहे.
एनआयएने छापेमारी केलेल्या भागातून अनेकदा दहशतवादी कारवाया झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या परिसरात एनआयएची पथके छापेमारी करत आहेत.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही सापडलेले नाहीत. त्याचा शोध हा खूप मोठ्या वेगाने घेतला जात आहे. संपूर्ण जम्मू काश्मीर खोऱ्यात सैन्य दलांकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. जम्मू काश्मीर पोलिस, भारतीय लष्कर, गुप्तचर यंत्रणा मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवत आहेत.
एप्रिल महिन्यात जम्मू काश्मिरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून २६ पर्यटकांचा जीव घेतला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली आहे. भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या काही भागात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
तसेच पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्ताधील 9 पेक्षा जास्त दहशतवादी अड्डे उध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने पाकिस्तानचे प्रत्येक हल्ले परतवून लावले आहेत.
आज एनआयएने जम्मू काश्मिरच्या पुलवामा, कुलगाम, शोपिया आणि अन्य संवेदनशील भागात छापेमारी केली आहे. एमआयएची अनेक पथके या भागात तपास करत आहेत. छापेमारी सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
एनआयएकडून 5 राज्यांत छापेमारी
देशविरोधी कारवायांवर जोरदार कारवाई करत नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) एका मोठ्या हेरगिरी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचवणाऱ्या एका रॅकेटचा माग काढत NIA ने पाच राज्यांतील 15 ठिकाणी धडक छापेमारी केली आहे. दिल्ली, मुंबई, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आसाम आणि पश्चिम बंगाल अशा राज्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली.
NIA Raid: मोठी बातमी! एनआयएकडून 5 राज्यांत छापेमारी; CRPF जवान व युट्यूबर अटकेत, प्रकरण काय?
पाकिस्तानमधून चालवले जात असलेले हेरगिरीचे जाळे
एनआयएच्या माहितीनुसार, या छाप्यांचा उद्देश भारतात पाकिस्तानी एजंटांच्या नेटवर्कला उघड करणे होता. या प्रकरणी संशयित व्यक्ती पाकिस्तानातील एजंटांच्या संपर्कात होत्या. त्यांनी भारतातील महत्त्वाची माहिती त्यांच्याशी शेअर केली होती, याबदल्यात त्यांना आर्थिक मोबदला दिला जात होता.
2023 पासून पीआयओंसोबत संवेदनशील माहिती शेअर करणाऱ्या व्यक्तींवर एनआयए लक्ष ठेवून होती. याच पार्श्वभूमीवर, 20 मे 2025 रोजी एनआयएने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.