काश्मीरमध्ये असे काय करत आहे भारत ज्यामुळे पाकिस्तान चिंतेत? 'त्याला' म्हटले धोकादायक शस्त्र; शाहबाज शरीफ तणावात ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
India Pakistan water dispute 2026 news : भारत आणि पाकिस्तान (India Pakistan water dispute 2026) यांच्यातील तणाव आता केवळ सीमेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो ‘पाण्या’वरून पेटण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी भारताने सिंधू पाणी करार (Indus Waters Treaty) रद्द करण्याच्या दिशेने पावले उचलल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये नद्यांवर वेगाने धरणे आणि जलसंचय प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. भारताची ही वाढती ताकद पाहून पाकिस्तानच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि तिथले लष्करी अधिकारी भारताच्या या जलप्रकल्पांना “धोकादायक शस्त्र” (Dangerous Weapon) म्हणू लागले आहेत.
भारत जम्मू-काश्मीरमधून वाहणाऱ्या झेलम आणि चिनाब या दोन प्रमुख पश्चिम नद्यांवर प्रचंड मोठे जलसंचय प्रकल्प राबवत आहे. यामध्ये सुमारे ६० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पांमुळे भारताला या नद्यांच्या पाण्यावर अधिक नियंत्रण मिळणार आहे. पाकिस्तानी मीडिया ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, भारताची ही वाढती क्षमता पाकिस्तानसाठी अस्तित्वाचा प्रश्न बनली आहे. भारताने ठरवले तर ते पाकिस्तानकडे जाणारे पाणी पूर्णपणे रोखू शकतात किंवा गरजेपेक्षा जास्त सोडून तिथे पूर आणू शकतात, असा दावा पाकिस्तान करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Epic Fury: युद्ध नाही, हा तर विनाश! अमेरिकेच्या ‘Scorpion Strike’ने आकाशातून पाठवले मृत्यूदूत,पहा ‘हा’ थरारक VIRAL VIDEO
पाकिस्तानच्या जल आणि वीज विकास प्राधिकरणाचे (WAPDA) अध्यक्ष निवृत्त लेफ्टनंत जनरल मोहम्मद सईद यांनी नुकत्याच एका बैठकीत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “सध्या भारताकडे १५ दिवस पाणी साठवण्याची क्षमता आहे, परंतु नवीन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ही क्षमता ५५ ते ६० दिवसांपर्यंत वाढेल.” ५५-६० दिवस पाणी रोखणे म्हणजे पाकिस्तानमधील शेतीचा गळा आवळण्यासारखे आहे. जेव्हा पाकिस्तानच्या पिकांना पाण्याची नितांत गरज असते, त्याच वेळी भारत पाणी रोखू शकतो, अशी भीती तिथल्या तज्ज्ञांना वाटते आहे.
Punjab Rural Sustainable Water Supply and Sanitation Project results (mid-2025): 218,000 people in 180 villages now have safe water – 99% of connected households receive WHO-standard supply. Delivering equitable, reliable services through PRMSC: https://t.co/ftST3PiW5y pic.twitter.com/gmUQuhA0VW — World Bank Group Pakistan (@WBG_Pakistan) March 2, 2026
credit – social media and Twitter
पाकिस्तानचा सर्वात मोठा आरोप असा आहे की, भारताकडे आता पाकिस्तानमध्ये ‘दुष्काळ’ किंवा ‘पूर’ निर्माण करण्याची शक्ती आली आहे. जर भारताने मुसळधार पावसाळ्यात साठवलेले पाणी एकदम सोडले, तर पाकिस्तानचा मोठा भाग पाण्याखाली जाऊ शकतो. दुसरीकडे, उन्हाळ्यात पाणी रोखल्यास तिथे पिण्याच्या पाण्याचाही हाहाकार माजेल. यालाच पाकिस्तान “भारताचे नवीन युद्धतंत्र” म्हणून संबोधत आहे. पाकिस्तानने आता या संकटाचा सामना करण्यासाठी स्वतःचे मोठे तलाव आणि साठवणूक केंद्रे बांधण्याची तयारी सुरू केली आहे, परंतु त्यांच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे हे प्रकल्प पूर्ण करणे कठीण दिसत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Israel Iran War: हिजबुल्लाहचा ‘राजकीय’ अंत! मोहम्मद राद इस्रायली हवाई हल्ल्यात ठार; IDFने प्रथमच केला ‘Iron beam’ने घातक प्रहार
१९६० मध्ये झालेला सिंधू पाणी करार हा जगातील सर्वात यशस्वी करारांपैकी एक मानला जातो, परंतु गेल्या काही वर्षांत दहशतवाद आणि सीमावादावरून भारताने आपली भूमिका कडक केली आहे. “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही,” या पंतप्रधान मोदींच्या विधानानंतर भारताने काश्मीरमधील नद्यांचे पाणी अडवण्याचे धोरण स्वीकारले आहे. भारताचे हे प्रकल्प आंतरराष्ट्रीय नियमांनुसारच असले, तरी पाकिस्तान मात्र याला जागतिक मंचावर नेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारताच्या ६० अब्ज डॉलर्सच्या या गुंतवणुकीने हे स्पष्ट केले आहे की, आता ‘पाणी’ हेच भारत-पाक संबंधांमधील सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे.
Ans: भारत मुख्यत्वे झेलम आणि चिनाब या दोन पश्चिम नद्यांवर जलसंचय आणि वीज प्रकल्प बांधत आहे.
Ans: पाकिस्तानला भीती आहे की भारत ५५-६० दिवस पाणी रोखून तिथे कृत्रिम दुष्काळ आणू शकतो किंवा पावसाळ्यात पाणी सोडून पूर आणू शकतो.
Ans: १९६० मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेला हा करार असून, यानुसार नद्यांच्या पाणी वाटपाचे नियम ठरवले गेले आहेत.






