चंदीगड : अमृतसरच्या जंदियाला गुरू परिसरात बुधवारी पंजाब पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एक गुंड मारला गेला. याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमृतपालसिंग (वय 22) याला दोन किलो हेरॉईन जंदियाला गुरू येथे नेण्यात आले होते. हातकड्या घातलेल्या असतानाही त्याने तेथे लपवलेल्या पिस्तुलाने पोलिसांवर गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला.
अमृतपालला मंगळवारी अटक करण्यात आली होती. अमृतसर (ग्रामीण) वरिष्ठ पोलिस अधीक्षक सतींदरसिंग म्हणाले, चौकशीदरम्यान अमृतपालने दोन किलो हेरॉईन लपविल्याचे उघड झाले. आम्ही त्याला ड्रग्ज पुनर्प्राप्त करण्यासाठी येथे आणले होते. अमृतपालने तेथे कोणतेही शस्त्र लपविल्याचे सांगितले नव्हते. पोलिस जेव्हा हेरॉईन जप्त करत होते, तेव्हा अमृतपालने 9 एमएमचे पिस्तूल काढून पोलिसांवर गोळीबार केला, त्यात एक अधिकारी जखमी झाला.
तर दुसऱ्याच्या पगडीला गोळी लागल्याने बचावला. अमृतपालचा किमान चार खून आणि खुनाच्या प्रयत्नाच्या दोन गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.