AIRPLANE (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम मध्ये 22 एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला होता. यात 26 पर्यटकांचा जीव गेला होता. यानंतर भारताने अनेक निर्णय घेतले. मंगळवारी रात्री उशिरा भारतीय सैनिक पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केली. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेसाठी ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं आहे.पाकिस्तानात 100 km आत घुसून हा ऑपरेशन हे स्तरीक करण्यात आली.भारतीय हवाई दलातील पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले नऊ तळांवर हवाई हल्ले केले. नऊ टारगेट ठेवण्यात आले होते. नऊच्या नऊ टार्गेट यशस्वी झाले आहेत. भारताने अनेक उड्डाणे दुपारी १२ वाजेपर्यंत रद्द केली आहेत. चला जाणून घेऊयात कोणते कोणते उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
संरक्षण मंत्रालयाच्या ऑफिशियल पत्रात नेमकं लिहिलं काय? गृहमंत्री अमित शाहांनी केलं लष्कराचे कौतुक
एअर इंडियाने एक एडवाइजरी जारी केला आहे की, ‘ सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता, एअर इंडियाने पुढील आदेश येईपर्यंत ७ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट येथील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. अमृतसरला जाणारी दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे दिल्लीला पाठवली जात असल्याचे विमान कंपनीने सांगितले. या अनपेक्षित व्यत्ययामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
इंडिगोने जारी केला सल्लागार
इंडिगोने त्यांच्या प्रवाशांसाठी एक सल्लागार जारी केला आहे आणि प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी विमानाबाबत माहिती गोळा करण्याचे आवाहन केले आहे. इंडिगोने एक सल्लागार जारी करत ट्विटरवर लिहिले की, ‘या भागातील बदलत्या हवाई परिस्थितीमुळे, श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड आणि धर्मशाळेला जाणाऱ्या आणि येणाऱ्या आमच्या विमानांवर परिणाम झाला आहे. सध्या सुरू असलेल्या हवाई निर्बंधांमुळे बिकानेरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांवरही परिणाम होत आहे.
इंडिगोने एका माजी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘विमानतळावर पोहोचण्यापूर्वी https://bit.ly/31paVKQ वर तुमच्या फ्लाइट्सची स्थिती तपासण्याचे आवाहन आम्ही तुम्हाला करतो.’
#6ETravelAdvisory: Due to changing airspace conditions in the region, our flights to and from #Srinagar, #Jammu, #Amritsar, #Leh, #Chandigarh and #Dharamshala are impacted. We request you to check your flight status at https://t.co/CjwsVzFov0 before reaching the airport.
— IndiGo (@IndiGo6E) May 6, 2025
पाकिस्ताननेही अनेक उड्डाणे रद्द केली
पाकिस्तानात झालेल्या हवाई हल्ल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. पाकिस्ताने देखील इस्लामाबाद आणि लाहोर विमानतळांवर जाणारी सर्व उड्डाणे पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहेत. अलिकडच्या सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
२२ एप्रिलला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी, भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात बंदी घातलेल्या जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला असलेल्या बहावलपूरचाही समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाने दुपारी १.४४ वाजता दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत लष्करी हल्ले करण्यात आले. भारतीय सशस्त्र दलांच्या कृती “केंद्रित, मोजमापित आणि चिथावणीखोर नसलेल्या” होत्या, असे मंत्रालयाने म्हटले आहे.