पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आम आदमी पक्षावर टीका (फोटो- ट्विटर )
PM Narendra Modi: दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. 5 तारखेला मतदान होणार आहे. तर 8 तारखेला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. कॉँग्रेस, भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात मुख्य लढत होत आहे. कॉँग्रेस आणि आयाम आदमी पक्ष इनिदय आघाडीमध्ये एकत्रित होते. मात्र दिल्लीत ते स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. दरम्यान प्रचार देखील जोरात सुरू आहे. एका प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल आणि आयाम आदमी पक्षावर टीका केली आहे.
कालच देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आले आहे. प्रत्येक वर्गांसाठी हे बजेट आनंद घेऊन आला आहे असे मोदी म्हणाले. मध्यमवर्गीय वर्गांसाठी हा अर्थसंकल्प अनुकूल असल्याचे मोदी म्हणाले. प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, “आम आदमी पक्षाच्या नितीमुळे कारखाने बंद होत आहेत. जनतेला लुटणाऱ्या या लोकांना याचे उत्तर द्यावे लागेल. एका बाजूला ‘आप-दा’ आहे जे खोट्या आश्वासनांसाठी आहे, तर दुसऱ्या बाजूला ‘मोदींची गॅरंटी’ आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
दिल्लीतील जनतेने भाजपचे सरकार निवडण्याचे ठरवले आहे. आप-दा ने राष्ट्रीय राजधानीची 11 वर्षे वाया घालवली. आता विकास आणि समृद्धीसाठी डबल इंजिनसरकार निवडून येणार आहे. केंद्रातले सरकार गरीब, शेतकरी, युवा आणि महिला या चार स्तंभाना मजबूत करण्याचे काम करत आहे. तसेच काल सादर झालेले बजेट हे मोदींची गॅरंटी पूर्ण करण्याची गॅरंटी आहे.
हेही वाचा: Rahul Gandhi On Kejriwal: “वॅगनआर घेऊन राजकारणात आले अन्…”; राहुल गांधींची केजरीवालांवर बोचरी टीका
पंतप्रधान मोदींचा अरविंद केजरीवालांना रोखठोक सवाल
दिल्लीच्या प्रचारसभेमध्ये आप नेते अरविंद केजरीवाल यांनी गंभीर आरोप केले होते. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी हरियाणात भाजपाचे लोक यमुना नदीच्या पाण्यात विष मिसळत आहेत आणि तेच पाणी दिल्लीत पाठवलं जात आहे, असा आरोप केला होता. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मला व दिल्लीत राहणाऱ्या सर्व न्यायाधीशांना मारण्यासाठी आपले हरियाणातील बांधव यमुनेच्या पाण्यात विष मिसळतील का?” असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भितीने ते बिथरले आहेत. मला विचारायचं आहे की हरियाणाचे लोक त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या पाण्यात विष मिसळतील का? मोदी व देशातील सर्व न्यायाधीश, जगभरातील विविध देशांच्या दूतावासातील अधिकारी तेच पाणी पितात. हरियाणातील लोक मोदी व न्यायाधीशांना मारण्यासाठी त्यांच्या पाण्यात विषय मिसळतायत असं केजरीवाल म्हणत आहेत. मुळात असा विचार तरी कोणी करू शकतं का?” असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केला आहे.