पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल (फोटो- ट्विटर)
वाराणसी: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वाराणसीत होते. त्यांनी आज वाराणसीमध्ये ५१ वा दौरा केला. पंतप्रधान मोदी यांनी आज ५२ प्रकल्पांचे उदघाट्न आणि शुभारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधीचा २० वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. यासाठी केंद्र सरकारने २,१८३ कोटी निधी दिला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेला संबोधित केले. सभेला संबोधित करताना पंतपधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरवरून काँग्रेसवर टीका केली.
वाराणसीमध्ये ऑपरेशन सिंदूरवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरनंतर मी पहिल्यांदा काशीमध्ये आलो आहे. जेव्हा २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यामध्ये २६ नागरिकांची दुर्दैवी हत्या करण्यात आली. त्यांच्या कुटुंबियांच्या वेदनेने माझे मन भरून आले. त्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद दे अशी मी महादेवाला प्रार्थना करत होतो.मी जे वचन दिले होते, ते पूर्ण झाले आहे.”
आज अपने संसदीय क्षेत्र वाराणसी से पीएम-किसान सम्मान निधि की राशि जारी कर और काशीवासियों के लिए विभिन्न विकास कार्यों का उद्घाटन व शिलान्यास कर अत्यंत प्रसन्नता हो रही है। https://t.co/ezUNEParvT
— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2025
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “शेतकरी धनधान्य योजनेअंतर्गत २,४०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मागच्या सरकारच्या काळात आमचा शेतकरी मागे पडला. त्यांच्यावर या योजनेचे लक्ष असणार आहे. या योजनेमुळे उत्तर प्रदेशमधील अनेक शेतकऱ्याना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी एनडीए सरकार पूर्ण क्षमतेने काम करत आहे.”
“जो भारतावर वार करेल. त्याला माही पाताळातून देखील शोधून काढू. मात्र ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यामुळे अनेकांच्या पोटात दुखत आहे. भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उध्वस्त केले हे काँग्रेसला आणि त्यांच्या साथीदारांना पचनी पडत नाहीये. पाकिस्तानची कशी स्थिती खराब झाली हे तुम्ही फोटोंमधून पाहिलेच असेल. मात्र पाकिस्तानची ही स्थिती काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडून पाहिली जात नाहीये.”
PM Narendra Modi Live: “मी सभागृहात भारताच्या…”; ‘ऑपरेशन सिंदूर’वरून मोदींचा विरोधकांना सणसणीत टोला
मोदींचा विरोधकांना सणसणीत टोला
मी आज सभागृहात भारताच्या बाजूने बोलायला उभा आहे. ज्यांना भारताची बाजू दिसत नाही, त्यानंमी आरसा दाखवण्यासाठी उभा आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे भारताच्या सामर्थ्याचे जगाला दिसले. ऑपरेशन सिंदूरम्हणजे १४० कोटी भारतीयांच्या इच्छाशक्तीचा विजय आहे. आता भारत बदला घेणार हे पाकिस्तानला कळले आहे. २२ मिनिटांत २२ एप्रिलच्या हल्ल्याचा बदला घेतला.पाकिस्तानची अणू हल्ल्याची धमकी आम्ही खोटी ठरवून दाखवली.