पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाकिस्तानवर टीका (फोटो- ट्विटर)
गांधीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. नरेंद्र मोदी हे गांधीनगर दौऱ्यावर आहेत. गांधीनगरमध्ये त्यांनी भव्य असा रोड शो केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहर विकास यात्रा २०२५ ची सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये तब्बल ५,५३६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी संबोधित करताना त्यांनी पाकिस्तानवर देखील टीका केली आहे.
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवर देखील भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “पाकिस्तान आपल्याला समोरासमोर पराभूत करू शकत नाही. त्यामुळे तो आपलयाविरुद्ध दहशतवादी कारवाया करत असतो. तिथे आपण मारलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले.”
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “जेव्हा दहशतवाद्यांनी पाकव्याप्त काश्मीरवर ताबा मिळवला. जर त्याच दिवशी दहशतवाद्यांना मारले असते. मात्र सरदार पटेलांचे म्हणणे ऐकले गेले नाही. दहशतवादी कारवायांचा खेळ ७५ वर्षांपासून सुरू आहे. पहलगाम देखील याचा हिस्सा आहे. पाकिस्तानबरोबर युद्धाची वेळ येते तेव्हा, भारताच्या तीनही सैन्याने पाकला पराभूत केले आहे.”
मोदी म्हणाले, “आम्ही २२ मिनिटांमध्ये दहशतवाद्यांची ९ ठिकाणे उद्ध्वस्त केली. यावेळेस सर्व काही कॅमेऱ्यासमोर केले. याचे कारण कोणी पुरावा मागू नये.”
भारत आता जगातील चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आता अर्थव्यवस्थेत आपण जपानच्या पुढे गेलो आहोत. आता आपल्याला तिसऱ्या स्थानी यायचे आहे. आपण ५ व्या आणि ६ व्या स्थानी आल्यावर देशात एक उत्साह होता. कारण आपण ब्रिटनला मागे सोडले होते.”
PM Modi Speech : ‘आनंदी रहा, सुखाने भाकर खा, नाहीतर माझी गोळी आहेच…’: PM मोदींचा पाकिस्तानला इशारा
PM मोदींचा पाकिस्तानला इशारा
गुजरातच्या मातीतून पंतप्रधान मोदींनी दहशतवाद आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला.भारत पर्यटनावर विश्वास ठेवतो, पर्यटन लोकांना जोडते पण पाकिस्तानसारखा एक देश देखील आहे, जो दहशतवादाला पर्यटन मानतो आणि हा जगासाठी एक मोठा धोका आहे. दहशतवादाविरुद्ध आमचे धोरण शून्य सहनशीलतेचे आहे. ऑपरेशन सिंदूरने हे धोरण आणखी स्पष्ट केले आहे. जो कोणी भारतीयांचे रक्त सांडण्याचा प्रयत्न करेल त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. आनंदी जीवन जगा, भाकरी खा… नाहीतर माझी गोळी आहेच, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. भारताची दिशा अगदी स्पष्ट आहे. भारताने विकासाचा मार्ग निवडला आहे, शांतता आणि समृद्धीचा मार्ग निवडला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.