पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : कॉंग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आज वाढदिवस साजरा केला जातो आहे. राहुल गांधी हे त्यांचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने देशभरामध्ये कॉंग्रेस नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. राहुल गांधी यांच्यावर देशातील सर्व प्रमुख खासदार, आमदार व नेत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोशल मीडियावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कट्टर राजकीय विरोधी असलेल्या नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी सोशल मीडिया पोस्ट करुन या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, “लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो.” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींना सदिच्छा दिल्या आहेत.
Birthday greetings to the Leader of the Opposition in the Lok Sabha, Shri Rahul Gandhi. May he be blessed with a long and healthy life.@RahulGandhi
— Narendra Modi (@narendramodi) June 19, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सोशल मीडियावर राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी लिहिले आहे की, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल जी गांधी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी सुप्रिया सुळेंना धन्यवाद मानले आहे. राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, सुप्रियाजी. महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत, महाविकास आघाडीपासून इंडिया आघाडीपर्यंत – एकत्रितपणे आपण लोकशाही संस्थांचे रक्षण करू आणि न्याय्य भविष्यासाठी मजबूत पाया रचू, असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले आहे.
शुभेच्छा के लिए धन्यवाद, सुप्रिया जी।
महाराष्ट्र से दिल्ली तक, MVA से INDIA तक – हम साथ मिलकर लोकतांत्रिक संस्थाओं की रक्षा करेंगे और न्यायपूर्ण भविष्य की मजबूत बुनियाद रखेंगे। https://t.co/VgNJps3Ta6— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 19, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त नवीन घरी राहण्यासाठी गेले आहेत. यापुढे राहुल गांधी यांचे आता ५, सुनहरी बाग रोड असा पत्ता असणार आहे. हे त्यांना सरकारी निवासस्थान असणार आहे. गेल्या वर्षी लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांना हा बंगला टाइप-८ श्रेणीत देण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी बुधवारी सकाळी औपचारिकपणे या नवीन निवासस्थानी स्थलांतरित झाले. सुरक्षेच्या आणि संसदीय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हे स्थान महत्त्वाचे आहे आणि ही श्रेणी फक्त वरिष्ठ नेत्यांनाच दिली जाते.