पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्याधाम जंक्शनचं केलं उद्घाटन, सहा वंदे भारत आणि दोन अमृत भारत ट्रेनलाही दाखवला हिरवा झेंडा!

या दरम्यान मोदींनी सहा वंदे भारत उद्घाटन(Vande Bharat) आणि दोन अमृत भारत ट्रेनलाही (Amrut Bharat) हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी नवीन अमृत भारत ट्रेनमध्ये मुलांची भेट घेतली. तसेच मुलांशी बराच वेळ गप्पाही मारल्या.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येतील (Narendra Modi) अयोध्याधाम जंक्शनचे (Ayodhya Dham) उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. या दरम्यान मोदींनी सहा वंदे भारत उद्घाटन(Vande Bharat) आणि दोन अमृत भारत ट्रेनलाही (Amrut Bharat) हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी नवीन अमृत भारत ट्रेनमध्ये मुलांची भेट घेतली. तसेच मुलांशी बराच वेळ गप्पाही मारल्या.

    आज सकाळच्या सुमारास पंतप्रधानांचे विमान वाल्मिकी विमानतळावर आगमन झाले. यानंतर त्यांचा ताफा अयोध्या धाम जंक्शनच्या दिशेने निघाला. मार्गावरील बॅरिकेडिंगच्या बाजूला सकाळपासूनच लोकांची गर्दी पंतप्रधानांची वाट पाहत होती. पहिल्या आठ किलोमीटरच्या रोड शोमध्ये लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी त्यांच्यावर सतत पुष्पवृष्टी करण्यात येत होती. पंतप्रधानांनी गाडीतून खाली उतरून नागरिकांना अभिवादन केलं.

    15,700 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार

    पंतप्रधानांनी आज पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशन राष्ट्राला समर्पित केले. यावेळी  श्री माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली, अमृतसर-नवी दिल्ली, कोईम्बतूर-बंगळुरू, मंगळुरू-मडगाव, जालना-मुंबई आणि अयोध्या-आनंद विहार टर्मिनल तसेच अयोध्या-दरभंगा आणि मालदा टाउन-फ्लॅग या दरम्यान 6 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सोडण्यात आल्या. मोदी ज्या प्रमुख प्रकल्पांची पायाभरणी करतील त्यामध्ये NH-27 च्या लखनौ-अयोध्या विभागाचे किमी 8.000 ते किमी 121.600 EPC मोडमध्ये रुंदीकरण, NH-27 वरील अयोध्या बायपासचे किमी 121.600 ते 144.0200 किमी रुंदीकरण यांचा समावेश आहे.

    दरम्यान, एअर इंडिया एक्सप्रेसने सांगितले की ते 17 जानेवारीपासून अयोध्या ते बेंगळुरू आणि कोलकाता यांना जोडणारी थेट उड्डाणे सुरू करणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला एअरलाइनने अयोध्या ते दिल्ली दरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली होती.