पंतप्रधान मोदी करणार पूरग्रस्त राज्यांचा दौरा (फोटो- ani)
पंतप्रधान मोदी पूरग्रस्त राज्यांची पाहणी करणार
हिमाचल प्रदेश व पंजाबमध्ये करणार दौरा
हजारो लोकांचे जनजीवन विस्कळीत
Flood Affected States: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्याचा दौरा करणार आहेत. देशभरात मुसळधार पावसाने काही कहर केला आहे. आज पंतप्रधान मोदी हे पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार आहेत. आज राजधानी दिल्लीत उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडणार आहे. मतदान प्रक्रिया झाल्यावर पंतप्रधान मोदी पठाणकोट एअरबेसवर दाखल होणार आहेत. त्यानंतर ते हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात हवाई पाहणी करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमध्ये राज्यातील अधिकारी यांच्याशी एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. तसेच पुरामुळे प्रभावित नागरिकांची ते भेट घेणार आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि बचाव कार्य करणाऱ्या जवानांशी भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी तीन नंतर आज पंतप्रधान मोदी पंजाबमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी चार वाजण्याच्या सुमारास गुरुदासपूर येथील लष्कराच्या कॅम्पला देखील भेट देणार आहेत.
पंजाबमध्ये मोठे नुकसान
पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूरस्थिती निर्माण झाली आहे. समोर आलेले माहितीनुसार, आतापर्यंत ४६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महापुरामुळे राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. जवळपास १ लाख ७३ हजार हेक्टरवरील पिके नुकसानग्रस्त झाली आहेत. सतलज, बियास, रावी नदीचे पाणी तसेच हिमाचल प्रदेश व जम्मू काश्मीरमध्ये होणारा मुसळधार पाऊस त्यामुळे पंजाबमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये काय स्थिती?
गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये देखील अती मुसळधार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी ढगफुटी झाल्याचे घटना घडली आहे.मुसळधार पाऊस आणि महापूर यामुळे राज्यात तब्बल ४ हजार १२२ कोटींचे नुकसान झाले आहे. जवळपास ३७० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज पंतप्रधान मोदी हिमाचल प्रदेश व पंजाब राज्याच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. हवाई पाहणी केल्यानंतर मोदी दोन्ही ठिकाणी उच्चस्तरीय बैठका घेणार आहेत.
पंजाबमध्ये मुसळधार
गेल्या काही दिवसांमधून पंजाब राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पंजाबमध्ये पुरामुळे आतापर्यंत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तीन लाखांपेक्षा जास्त नागरिक प्रभावित झाले आहेत.