नजर चुकवून एटीएममध्ये कार्ड अदलाबदल करून करायचे फसवणूक; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
गुरुग्राम पोलिसांनी एटीएम कार्डाची सफाईदार फसवणूक करून लोकांच्या खात्यातून पैसे लांबवणाऱ्या दोन शातिर आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी लोकांची नजर चुकवून त्यांच्या एटीएम कार्डांची अदलाबदल करून नंतर खात्यातून मोठी रक्कम काढून फरार होत असत.
नोव्हेंबर २०२४ मध्ये डीएलएफ फेज-३ भागात अशीच एक घटना घडली होती. एका व्यक्तीने एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले असताना, या दोघांनी त्याची फसवणूक करत अत्यंत चलाखीने त्याचे एटीएम कार्ड बदलून टाकले आणि त्याच्या खात्यातून ६७ हजार रुपये काढले.
सीसीटीव्ही फुटेजमधून हे स्पष्टपणे दिसते की, जेव्हा पीडित व्यक्ती पैसे काढत होता, तेव्हा त्याच्या मागे उभा असलेला एक आरोपी त्याच्याशी बोलण्याच्या बहाण्याने गोंधळ निर्माण करतो आणि मशीनसमोर स्वत: उभा राहतो. त्याचवेळी दुसरा आरोपी आत येतो आणि पीडिताला गप्पांमध्ये गुंतवतो. काही सेकंदांत हे दोघे मिळून पीडिताचे कार्ड बदलतात आणि रक्कम काढून फरार होतात.
आधी जनावरांच्या गोठ्यात बांधले, नंतर केळी, टरबुजाची साली खायला…..; गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना
गुरुग्राम पोलिसांनी या दोघांना दिल्लीच्या आयानगर येथून अटक केली असून त्यांची ओळख मनीष उर्फ कालू आणि राकेश अशी झाली आहे. हे दोघेही उत्तर प्रदेशमधील अलीगढ जिल्ह्यातील जरारा गावचे रहिवासी आहेत.पोलिस प्रवक्ता संदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत आरोपींनी गुरुग्राममध्ये अशाच पद्धतीने आणखी एका फसवणुकीची कबुली दिली आहे. पुढील तपास व जप्ती कारवाईसाठी दोघांना कोर्टात हजर करून दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे.