कोकण रेल्वे (फोटो- सोशल मीडिया)
कोकण रेल्वेत तिकीट तपासणी मोहीम तीव्र
३,६८,९०१ वर्षभरातील फुकटे प्रवासी
मांडवी, मत्स्यगंधा, कोकणकन्यात प्रकार उघडकीस
खेड: रेल्वेगाड्यातून प्रवास करणाऱ्या फुकट्यांना चाप लावत आर्थिक तूट भरून काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणी मोहीम तीव केली आहे. डिसेंबरमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात पथकाने ९९८ कारवाया करत ४३,८९६ फुकट्या प्रवाशांना रंगेहाथ पकडले. या फुकट्या प्रवाशांकडून २ कोटी ४५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
वर्षभरात ३ लाख ६८ हजार ९०१ फुकटे प्रवासी कारवाईच्या कचाट्यात अडकले. त्यांच्याकडून २० कोटी २०लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. नियमित रेल्वेगाड्यांसह स्पेशल गाड्यामधून प्रवास करणाऱ्या फुकट्यांची संख्या सर्वाधिक असल्याची बाब समोर आल्यानंतर रेल्वे विशेष भरारी पथकाने तिकीट तपासणी मोहीम गतिमान केली आहे.
आता रेल्वेत तिकीट तपासणी मोहीम होणार अधिक तीव्र
विनातिकिट प्लॅटफॉर्मवर प्रवेश करणा-यांची संख्याही तितकीच असल्याने त्यांच्याकडूनही दंड आकारण्यात येत आहे. डिसेंबरमहिन्यात ४३.८९६ फुकट्या प्रवाशांना दणका देण्यात आला, जानेवानी ते डिसेंबर अखेरपर्यंत ८.४८१ मोहीमा राबवण्यात आल्या, या मोहिमेंतर्गत ३ लाख ६८ हजार ९०१ फुकटे कारवाईच्या कचाट्यात अडकले, त्यांच्याकडून २० कोटी २७लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यापुढेही तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. कोकण रेल्वे सर्व प्रवाशांना कोणत्याही गैरसोयीसह कारवाईघासून वाचण्यासाठी वैच तिकिटांसह प्रवास करण्याबाबत सातत्याने सूचित करत आहे. सर्व प्रवाशांनी सुरक्षित, सुव्यवस्थित आणि आरामदायी प्रवासासाठी वैच तिकिटावरच प्रवास करणे अनिवार्य असल्याचे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी सांगितले.
Kokan Railway: कोकणवासियांसाठी खुशखबर! ‘या’ गाड्यांना कणकवली,सिंधुदुर्गात मिळणार थांबा
मांडवी, मत्स्यगंधा, कोकणकन्यात प्रकार उघडकीस
एकीकडे प्रवाशाना सुरक्षित अन् दर्जेदार सेवा रेल्वे प्रशासनाकडून दिल्या जात असतानाही दुसरीकडे मात्र बहुतांश रेल्वे प्रवासी ‘फुक्कट’ प्राइस करत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे फुकटचा प्रवाशांमध्ये परप्रांतीय प्रवाशांची संख्या सर्वाधिक असल्याची बाब समोर आली आहे. कोकण मागाँवरील त्या त्या स्थानकात विशेष भरारी पथके कोणत्याही क्षणी डेरेदाखल होवून तिकीट तपासणी मोहीम हाती घेत असल्याने फुकटांची त्रेधातिरपीट उडत आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






