Twisha Sharma Case: 'मृत मुलीपेक्षा घटस्फोटीत मुलगी केव्हाही बरी'; ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात तुषार मेहतांची महत्त्वपूर्ण टिप्पणी
या प्रकरणाची आज (25 मे) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणी वेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी “मृत मुलीपेक्षा घटस्फोटीत मुलगी केव्हाही बरी.” तसेच, ट्विशाने सासरच्या मंडळींबाबत केलेल्या तक्रारींबाबत जर कुटुंबियांनी वेळीच कारवाई करायला हवी होती. असं म्हणत नाराजीही व्यक्त केली.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे मध्य प्रदेश सरकारच्या वतीने सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पंचौली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली, तर ज्येष्ठ वकील सिद्धार्थ दवे यांनी आरोपी कुटुंबाचे प्रतिनिधित्व केले.
‘लाइव्ह लॉ’च्या वृत्तानुसार, ट्विशाच्या सासू आणि माजी जिल्हा न्यायाधीश गिरीबाला सिंह यांनी टिव्ही चॅनेल्सवर काही दावे करत ट्विशावर आरोप केले होते. त्यावर, गिरीबाला सिंह या टीव्ही चॅनलवर मुलाखती देऊन आपल्या सुनेची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तपासात सहकार्य करत नाहीयेत,” असेही सांगितले. त्यावर
जेव्हा सिद्धार्थ दवे यांनी प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवर नाराजी व्यक्त केली आणि सांगितले की फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (CrPC) कलम १६४ अंतर्गत नोंदवलेला संपूर्ण जबाब आजच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे, तेव्हा सॉलिसिटर जनरल (SG) तुषार मेहता म्हणाले, “आणि ट्विशाची सासू गिरीबाला सिंह, विविध वाहिन्यांवर मुलाखती देत आहेत आणि आपल्या सुनेची बदनामी करणारी विधाने करत आहेत.”
सिद्धार्थ दवे यांच्या युक्तिवादाला उत्तर देताना सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, आम्ही कोणतेही नॅरेटिव्ह रचण्याच्या विरोधात आहेत, म्हणूनच या तपासाची जबाबदारी सीबीआय’कडे सोपवण्यात आली आहे. आमचा पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. पण प्रसारमाध्यमांनी आपली कर्तव्ये जबाबदारीने पार पाडावीत, कोणत्याही पक्षाच्या विधानांवर आधारित दावे करू नयेत. तसेच या प्रकरणाशी संबंधित दोन्ही पक्षकारांच्या मित्रांशी किंवा नातेवाईकांशी बोलू नये, असे आवाहनही सुर्यकांत यांनी केलं आहे.
दरम्यान, सरकारी वकील मेहता यांनी , गिरीबाला सिंग यांचा जबाब नोंदवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु त्या जबाब देण्यास तयार नव्हत्या. त्यांच्या सासूने तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा केला. त्यावर गिरीबाला यांच्या वकिलांनी आक्षेप घेत, ” मेहता यांचा दावा चुकीचा असून अशा गोष्टींवर येथे चर्चा करू नये. गिरीबाला यांनी त्यांचा जबाब नोंदवला असल्याचे सांगितले.
पीडितेच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी न्यायालयाला सांगितले की, घटनेच्या तीन दिवसांनंतर FIR दाखल करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर पुरावे सुरक्षित ठेवण्यातही हलगर्जीपणा करण्यात आला. गिरीबाला सिंग स्वतःचे कॉल डेटा रेकॉर्ड सादर करत आहेत, ज्याला परवानगी नाही. सरकारी वकील तुषार मेहता यांनी न्यायालयाला माहिती दिली की, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, दिल्ली एम्सच्या पथकाने रविवारी ट्विशाचे दुसरे शवविच्छेदन केले.






