17 दिवसाच्या प्रयत्नानंतर अखेर उत्तरकाशीतील सिल्क्यरा बोगद्यातून (Uttarakashi tunnel rescue opration) अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. या सर्व कामगारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी () यांनी फोनवर संवाद साधला. त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. तसेच, 17 दिवस या कठीण परिस्थितीत धैर्य राखल्याबद्दल पंतप्रधानांनी कामगारांचे कौतुकही केले.
[read_also content=”17 दिवसांनंतर उत्तरकाशीत सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 कामगारांची सुटका! https://www.navarashtra.com/india/all-41-workers-trapped-in-silkyra-tunnel-in-uttarkashi-rescued-after-17-days-nrps-484561.html”]
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत या बचाव कार्यावर सतत लक्ष ठेवून होते. ते सकाळ संध्याकाळ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून बचाव कार्याची माहिती घेत होते. पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारीही बचाव कार्यावर लक्ष ठेवून होते.
४१ मजुरांना बाहेर काढल्यांनतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करून आनंद व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, “उत्तरकाशीतील आमच्या कामगार बांधवांच्या बचाव मोहिमेचे यश सर्वांनाच भावुक करत आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना मी सांगू इच्छितो की तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देत आहे. मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. तुम्हाला चांगले आरोग्य लाभो”
सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या सर्व ४१ मजुरांची मंगळवारी रात्री सुटका करण्यात आली. ते 17 दिवस बोगद्यात अडकून राहिले. बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात दरड कोसळल्याने कामगार आत अडकले होते. रेस्क्यू ऑपरेशनच्या अंतिम टप्प्यात रॅट-होल मायनर्स तैनात करण्यात आले होते. त्यांनी भंगारात मॅन्युअली ड्रिलिंग करून बोगद्यात 800 मिमी पाईप टाकले. हे सर्व कामगार उत्तराखंड, झारखंड, उत्तर प्रदेश, ओरिसा, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि हिमाचल प्रदेशातील आहेत.