पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथील इंडिया डेव्हलप नॉर्थ ईस्ट कार्यक्रमात जगातील सर्वात लांब बोगद्याच ((World’s Longest Tunnel In Arunachal Pradesh) उद्घाटन केलं. हा द्वि-लेन बोगदा असून त्याला सेला बोगदा या नावानं ओळखलं जातं. हा बोगदा बांधण्यासाठी सुमारे 825 कोटी रुपये खर्च आला आहे. त्याची पायाभरणी 2019 मध्ये पंतप्रधान मोदींनी केली होती.
[read_also content=”पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीचा लुटला आनंद! https://www.navarashtra.com/india/prime-minister-narendra-modi-on-his-visit-to-assam-did-jungle-safari-in-kaziranga-national-park-nrps-513849.html”]
अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी संबोधित केले.कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसवर टिका केली. काँग्रेसने सीमाभाग अविकसित ठेवण्याचा प्रयत्न केला. सेला बोगदा यापूर्वीही बांधता आला असता, पण त्यांचा प्राधान्यक्रम वेगळा होता. त्यांना वाटले अरुणाचलमध्ये लोकसभेच्या दोनच जागा आहेत. इतके काम कशाला करायचे.
पंतप्रधान मोदी आज दुपारी जोरहाटमध्ये महान अहोम सेनापती लचित बारफुकन यांच्या 125 फूट उंचीच्या ‘स्टॅच्यू ऑफ शौर्य’ पुतळ्याचे उद्घाटन करतील. दिवसाच्या उत्तरार्धात, ते जोरहाट जिल्ह्यातील मेलेंग मेटेली पोथरला भेट देतील आणि सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या विकासात्मक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. ते एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत.






